तालुका/प्रतिनिधी ; चाफळ ता.पाटण जि.सातारा येथे भर चौकात दिवसाढवळ्या तरुणीवर भ्याड हल्ला करून चाकूने गळा चिरून निर्दयपणे तिचा खुन करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी , सदर गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा.
सदर मुलीच्या कुटुंबाला शासनाने तातडीने शासकीय मदत जाहीर करावी. व सदर मुलीच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे. अश्या मागण्याचे निवेदन तहसीलदार सांगोला व पोलिस अधीक्षक सांगोला यांना देण्यात आले.
गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महिला/मुलीवरच्या अन्याय, अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. व या घटना दिवसोंदिवस वाढत आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र राज्यात महिला/मुलीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. व राज्यभर कायदा सुव्यवस्थेचे वारंवार धिंडवडे निघत आहेत.
आणि राज्यातील मुली/महिलांमध्ये भितीदायक चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने सदरच्या अतिशय क्रूरतेने दिवसाढवळ्या भर चौकात घडलेल्या घटनेची तातडीने दखल घ्यावी. अन्यथा सदर घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी राज्यातील सर्व तालुक्यात संघटनेच्या वतीने उग्र स्वरुपाची अंदोलने करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी सांगोला तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन नितीन जाधव व पोपट काळेल तसेच सांगोला पोलीस स्टेशनचे हुले साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देतेवेळी भिम क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय बनसोडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, काँग्रेसचे सांस्कृतिक विभाग राज्य उपाध्यक्ष अँड. महादेव कांबळे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष खंडू (तात्या) सातपुते, जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. उमेश मंडले,जिल्हा सचिव मधुकर चव्हाण(सर),जिल्हा युवक उपाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण, ता.युवक अध्यक्ष आकाश चव्हाण, ता.सचिव सुभाष बोडरे,संघटनेचे पदाधिकारी माऊली (ज्ञानेश्वर)पाटोळे, रत्नाकर जाधव, सोमनाथ चव्हाण, भारत चव्हाण, धनाजी चव्हाण, नवनाथ चव्हाण, जिवा चव्हाण, राजू मंडले,संतोष मंडले,सागर झंपले,प्रशांत जाधव, अनिल डोईफोडे, सचिन चौगुले, सुरज माने यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments