आईच्या चारित्र्यावर संशय घेतो म्हणून मुलांनीच बापाला मारले !
आईच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाणी , शिवीगाळ आणि वाद घालणारी बापाला २ मुलांनीच ठार मारल्याचा उलगडा आता झाला आहे. आज सकाळी जळगावात ही घटना घडली . बापाचे मारेकरी ठरलेल्या या दोन्ही मुलांच्या विरोधात त्यांच्या काकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रेमसिंग अभिसींग राठोड (वय ५०) हे निमखेडी शिवारात कांताई नेत्रालयाच्या परिसरात गो सेवा केंद्रात पत्नी , दोन मुले, दोन मुली यांच्यासह वास्तव्यास होते. ते काही दिवसांपासून आजारी असल्याने आज त्यांना त्यांची मुले दीपक आणि गोपाळ यांनी दवाखान्यात जाण्याचे सुचविले. मात्र प्रेमसिंग यांनी नकार दिला. यावर घरात वाद झाला असे आधी सांगण्यात आले होते .
त्यानंतर या आरोपी मुलांचा काका रोहिदास राठोड ( वय ३५ , रा – दत्त मंदिराजवळ , निमखेडी रोड , जळगाव ) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , काही दिवसांपासून प्रेमसिंग राठोड हे त्यांची पत्नी बसंतीबाईंच्या चारित्र्यवर संशय घेऊन त्यांना मारहाण , शिवीगाळ करीत होते , या वादात दोन्ही मुले गौतम उर्फ गोपाळ आणि दीपक हे आईच्या बाजूने उभे राहून बापाशी भांडत होते . कित्येकदा काका रोहिदास राठोड हे त्या कुटुंबातील सगळ्यांची समजूत घालून वाद वाढू नये प्रयत्न करीत होते. आज सकाळी ११ वाजता दीपकचा काका रोहिदास राठोड यांना फोन आला होता त्यात त्याने आज पुन्हा वडील आईला त्याच वादातून मारहाण करीत असल्याचे त्याने सांगितले होते. रोहिदास राठोड हे प्रेमसिंग राठोड यांच्या घरी पोहचले तेंव्हा त्यांना प्रेमसिंग राठोड रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले होते. मुलगा गौतम तेथे उभा होता . प्रेमसिंग राठोड यांची पत्नी बसंतीबाई राठोड यांनी रोहिदास राठोड यांना सांगितले की नेहमीच्याच वादात आजही पती मला मारहाण आणि शिवीगाळ करीत होते त्यामुळे मुले गोपाळ आणि दीपक यांना राग आला होता. या रंगात दिपकने वडिलांना धरून पकडून ठेवले आणि गोपाळने त्यांच्यावर चाकूने वार केले त्यात त्यांचा मृत्यू झाला त्याचवेळी घटनास्थळी हजर असलेले प्रसाद घोरपडे यांनीही या प्रमाणेच मारहाण आणि हत्येच्या घटनेला दुजोरा दिला या फिर्यादीवरून बापाचे मारेकरी ठरलेल्या दीपक राठोड आणि गौतम राठोड या दोन आरोपी मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळाल्यावर .तालुका पोलीस स्थानकाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दीपक आणि गोपाळ या मुलांना ताब्यात घेतले घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, तालुका पोलीस स्थानकाचे निरिक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट दिली.
रस्त्याने जाणाऱ्या पोलिसनेच आरोपींना पकडून ठेवत तालुका पोलिसांना फोन केला.भररस्त्यावर ही घटना घडत असताना तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी शाम बोरसे याच रस्त्याने दुचाकीने येत होते. त्यांनी पाहीले असात, यावेळी प्रेमसिंग रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर गोपाळ हातात चाकु घेऊन तेथेच उभा होता. मोठा मुलगा दीपक हातात काठी घेऊन घटनास्थळावरच होता. गोपाळ याने चाकुने वार केल्याचे बोरसे यांना दुचाकीवरुनच दिसले होते. त्यामुळे बोरसे यांनी तात्काळ दीपक व गोपाळ या दोघांना पकडून ठेवत पळुन जाऊ नये म्हणून त्यांच्या हातात बेड्या घातल्या. पोलिस ठाण्यात फोन करुन घटनेची माहिती दिली. थोड्याच पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पथक घटनास्थळी आले. त्यांनी गोपाळ व दीपक या दोघांना ताब्यात घेतले. तर घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला.
0 Comments