google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाटंबरे गावठाण मधील जुन्या सांगोला,मिरज रोड चे अस्तित्व संपन्याच्या मार्गावर.

Breaking News

वाटंबरे गावठाण मधील जुन्या सांगोला,मिरज रोड चे अस्तित्व संपन्याच्या मार्गावर.

 वाटंबरे गावठाण मधील जुन्या सांगोला,मिरज रोड चे अस्तित्व संपन्याच्या मार्गावर.


सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील जुन्या सांगोला मिरज रोडचे अस्तित्व आता संपन्याच्या मार्गावर आहे. गावाच्या पश्चिम दिशेला असलेला जुना सांगोला मिरज रोड आत्ताचा रत्नागिरी नागपूर हा हायवे वाटंबरे गावाच्या दक्षिणे बाजुने त्यावेळी चालु केल्या मुळे पहील्या जुन्या सांगोला मिरज रोड चे महत्व कमी होत गेले. कित्येक वर्ष झाले सार्वजनिक बांधकाम विभागाने या रोडकडे दुर्लक्ष करत.


दुरुस्ती केली नसल्याने या रोडचे आता अस्तीत्व संपन्याच्या मार्गावर आहे. या रोडवर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढल्याने चिणके, यलमार मंगेवाडी, अजनाळे ,कुठे वस्ती, शिंदे वस्ती तसेच वाटंबरे गावातील नागरिकांना व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रोड विषयी वाटंबरे ग्रामपंचायत यांच्याकडे चौकशी केली असता ,यावेळी ग्रामपंचायत यांनी हा रोड सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्याकडे येत असल्याचे सांगितले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरीत लक्ष देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाटंबरे ग्रामस्थ व वाहनधारक आतून होत आहे .

Post a Comment

0 Comments