google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी ! आता घरीच मिळणार कोरोना लस ; ला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल

Breaking News

मोठी बातमी ! आता घरीच मिळणार कोरोना लस ; ला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल

 मोठी बातमी ! आता घरीच मिळणार कोरोना लस ;  ला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल


आतापर्यंत कोरोना लस घेण्यासाठी कोरोना लसीकरण  केंद्रावर जावं लागत होतं  पण आता घरच्या घरीच कोरोना लस घेता येणार आहे  डोअर टू डोअर लसीकरणाला  केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.दारोदारी लसीकरणाबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बऱ्याच नागरिकांसाठी हा दिलासा आहे. किती तरी लोक असे आहेत, जे दिव्यांग आहेत किंवा आजारी आहेत. ज्यामुळे त्यांना जागेवरून हलता येत नाही. पण त्यांनी कोरोना लस घेणं गरजेचं आहे कारण त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. पण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलताही येत नसल्याने लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचणं त्यांना शक्य होत नाही. 


अशा नागरिकांसाठी याआधी सरकारने जवळच लसीकरण केंद्र उपलब्ध करून दिले होते. पण अद्यापही काही लोकांना तिथपर्यंतही जाता येत नाही हे सरकारच्या निदर्शनास आलं.त्यामुळे सरकारने आता दिव्यांग आजारी, आजारपणामुळे अंथरूणाला खिळलेले रुग्ण अशा सर्वांसाठी घरीच कोरोना लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नाही. यासाठी गाइडलाइन्सही जारी करण्यात आल्या आहेत. हे सुसाट!


भारत देश पुन्हा एकदा कोरोना लसीकरणात सुपरफास्ट भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत 83 कोटीहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. 66% प्रौढ नागरिकांना कोरोमना लशीचा एक डोस देण्यात आला आहे, तर 23 टक्के नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण मोहिमेचा नियमितपणे आढावा घेतला जात असून देशातील सर्वात असुरक्षित असलेल्या घटकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांचे निरीक्षण केलं जातं आहे. हे '2022 पर्यंत भारतात तयार होणार 100 कोटी कोरोना लसींचे डोस' आता केंद्राने घऱोघरी लसीकरणाचा निर्णय घेतल्याने कितीतरी नागरिकांचा लसीकऱणाचा मार्ग सोपा झाला आहे. त्यामुळे कोरोना लसीकऱणाचा आकडाही अधिक वाढेल.

Post a Comment

0 Comments