शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील रिसोर्स फार्मर्स व पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांचे सोबत अजनाळे येथे परिसंवाद बैठक - आमदार शहाजीबापू पाटील.
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार.
सांगोला (वार्ताहर) : शनिवार दि.२५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादाजी भुसे हे सांगोला तालुक्यात येणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्यातील रिसोर्स फार्मर्स व पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांच्यासोबत सकाळी १०:३० वाजता बैठक आयोजित केल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. या बैठकीसाठी सांगोला तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांच्यासोबत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, प्रा.पी.सी. झपके, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कृषी मंत्री दादाजी भुसे हे प्रथमच सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यामध्ये बामणी येथील प्रगतशील शेतकरी सदाशिव साळुंखे यांच्या ड्रॅगन फ्रुट बागेची पाहणी करणार आहेत तसेच यलमार मंगेवाडी येथील तेल्या व मर रोगाने जळलेल्या डाळिंबांच्या बागांची पाहणी करणार आहेत. यानंतर अजनाळे येथे सर्व शेतकरी व पीक विजेते स्पर्धक यांच्यासोबत शेतीच्या विविध अडचणी व त्यावर उपाययोजना यासाठी परिसंवाद बैठक घेणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
0 Comments