माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटना सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर .. सांगोल्याचे श्री धनाजी जाधव यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड
तालुका/ प्रतिनिधी ; माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय भाऊ माळी आधारस्तंभ व सौ रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक कार्य संघटनेचे काम तळागळातील माळी बांधवा पर्यंत पोहोचण्यासाठी संघटनेची स्थापना केलेली आहे ...
ही संघटना कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.माळी समाज एकत्र येऊन आवाज उठवण्यासाठी व प्रत्येक माळी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेच्या स्थापना केली आहे . माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष , तालुकाध्यक्ष , पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं पाहून अशा पदाधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आलेली आहे .. आज महाराष्ट्रामध्ये माळी सेवा संघाचे काम उत्कृष्टपणे चाललेलं आहे . सर्वच पदाधिकारी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्याचे काम करत आहे .
१ ) सोलापूर जिल्हा प्रभारी म्हणून बापूसाहेब बोराडे यांची निवड करण्यात आलेली आहे .२ ) सोलापूर जिल्हाध्यक्षपदी धनाजी जाधव यांची निवड ३ ) सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी बापुसाहेब गवळी यांची निवड ४ ) सोलापूर जिल्हा संघटकपदी सुनील जाधव यांची निवड ५ ) सोलापूर जिल्हा सहसंघटक पदी पोपट गायकवाड यांची निवड ६ ) सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी कल्याण माळी ७ ) सोलापूर जिल्हा सचिव पदी गणेश म्हेत्रे यांची निवड ८ ) सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष पदी अनिकेत आदलिंगे यांची निवड ९ ) सोलापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष पदी प्रदीप देवकर यांची निवड ...
या निवडी प्रदेश कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊ माळी , उपाध्यक्ष बालाजी माळी , उपाध्यक्ष ज्ञानदेव जाधव , वधुवर सुचक अध्यक्ष मुरलीधर भुजबळ , युवा कार्याध्यक्ष महेश गोरे , बि.आ.बालाजी वाहील , लिगल सेल अध्यक्ष अॅड नितीन राजगुरू , प्रदेशाध्यक्ष अमोल अनंतकळवसकर , प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी करण्यात आल्या आहेत.त्यावेळी धनाजी जाधव म्हणाले की आधी मी सांगोला तालुका अध्यक्ष काम केले आहे.कामाची पोचपावती म्हणुन संघटनेने सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले.आणि आता सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून जी प्रदेश कार्यकारिणी जी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे ती नक्कीच विश्वासास पात्र राहीन ..
0 Comments