google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संतापजनक : डोंबिवलीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Breaking News

संतापजनक : डोंबिवलीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

 संतापजनक : डोंबिवलीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार


डोंबिवलीत १५ वर्षाच्या मुलीवर मागील ९ महिन्यात २९ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण डोंबिवली शहर हादरले असून, मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत २३ आरोपींना अटक केली आहे.त्यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. इतर ६ आरोपींचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती मानपाडा पोलिसानी दिली आहे. पीडित मुलगी ही डोंबिवली पूर्व भोपर येथे राहणारी असून मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे.


या पीडित मुलीचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. याचा फायदा घेत या तरुणाने जानेवारी महिन्यात या तरुणीवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर हा व्हिडीओ आपल्या मित्राला दिला असता त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला, त्यानंतर त्याने दुसऱ्या मित्राला व्हिडीओ पाठवला असे करता करता ९ महिन्यात या व्हिडीओच्या माध्यमातून २९ जणांनी पीडित मुलीला धमकावून तिच्यावर बळजबरीने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन अत्याचार केला.


हा प्रकार सुरू असताना अखेर पीडित तरुणीने तिच्या सोबत होणाऱ्या या प्रकाराला कुटूंबासमोर वाचा फोडली. बुधवारी रात्री कुटुंब पीडित मुलीला घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. मानपाडा पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करून तिच्या जबाबवरून २९ जणांविरुद्ध सामूहिक अत्याचार, धमकी देणे, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून रात्रीच आरोपीची धरपकड करीत २१ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघेजण अल्पवयीन असून, त्यांना भिवंडी येथील बालसुधार गृह येथे पाठवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments