स्व.भाई गणपतरावजी देशमुख यांचे भव्य स्मारक उभारणार: ना.जयंतरावजी पाटील
सांगोला प्रतिनिधी:- स्व.भाई गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांच्या राजकीय सामाजिक कार्याचा विचार करुन त्यांची साधी रहाणी, उच्च विचार, निस्वार्थी सेवा,एकनिष्ठता ह्याची संपुर्ण राज्याला माहीती आहेच. परंतु येणाऱ्या काळात तरुणांना त्यांच्या कामाची माहीती व्हावी व त्यांचे स्मारक एक नव्या पिढ्यासाठी आदर्शवत असावे व स्व.आबासाहेबांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा यासाठी महाराष्ट्रातील विविध पक्षातील व विविध नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रीत येऊन स्व. आबासाहेबांचे आदर्शवत स्मारक सांगोलेमध्ये करण्याची मागणी प्रत्यक्ष भेटुन निवेदनाद्वारे केली.
मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतरावजी पाटील साहेब यांच्यासोबत वैचारिक सामाजिक राजकिय शैक्षणिक व विविध विषयांवर भरीव चर्चा केली यावेळी स्व.भाई गणपतरावजी देशमुख यांना पद्मश्री किताब मिळावा, त्यांचे भव्य स्मारक विधानभवन व सांगोला परिसरात उभारावे, त्यांनी पाणी चळवळीसाठी केलेल्या कामाचा उचित सन्मान म्हणून टेंभू योजनेला भाई गणपतरावजी देशमुख यांचे नाव द्यावे अशी निवेदनाद्वारे मागणी करीत असताना महाराष्ट्राचा वैचारिक बुलंद आवाज प्रा.यशपाल भिंगे सर, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव प्रा.नारायण खरजे, सामाजिक नेते मा.उल्हासशेठ धायगुडे, बहूजन वैचारिक प्रवक्त्या कु. प्रियदर्शिनी ताई कोकरे, वैचारिक नेतृत्व मा.विवेक कोकरे, धाडशी नेतृत्व मा. काकासाहेब मारकड, समाजसेवक मा. अशोक वाघमोडे, कु.भारतरत्न कोकरे व आदि पदाधिकारी व शिष्टमंडळ उपस्थित होते.
नामदार जयंतराव पाटील यांनी स्व. भाई गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवलेला आहे, विधिमंडळात 11 वेळा एकाच पक्षातून निवडून येऊन त्यांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. आदर्शवादी राजकीय नितिमुल्यांच्या पायावर त्यांनी तमाम समाजाच्या विकासासाठी आपले आयुष्य व्यथीत केले आहे. अशा नेत्याचे स्मारक सांगोले येथे व्हावे यासाठी मी तत्वता मान्यता देत असलेचे सांगितले व वरील सर्वच मागण्या त्वरीत मार्गी लावण्याचा आग्रह ऊल्हास धायगुडे यांनी धरला. अशा प्रकारे नामदार जयंत पाटीलसाहेब यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाला असलेची माहिती शेकापक्षाचे प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
0 Comments