google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरकरांनो! वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालाल तर सावधान; आता ट्रॅफिक पोलिसांच्या शर्टवर कॅमेरा

Breaking News

सोलापूरकरांनो! वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालाल तर सावधान; आता ट्रॅफिक पोलिसांच्या शर्टवर कॅमेरा

 सोलापूरकरांनो! वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालाल तर सावधान; आता ट्रॅफिक पोलिसांच्या शर्टवर कॅमेरा 


वाहनधारकानो आता थोडं सावध राहा.कारण, तुम्ही एखाद्या तक्रारीवरून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत असाल तर त्याचे चित्रीकरण होण्याची शक्‍यता आहे.शहर वाहतूक पोलिस प्रशासनाने आता वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या शर्टावर बॉडी वोर्न कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.वाहतूक शाखेत पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांच्या शर्टावर बॉडी कॅमेरा बसवला जात असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.वाहतूक शाखेच्या पोलिसांबरोबर वाहनचालकांचे अनेकदा वाद होतात. वाहनचालक अनेकदा हुज्जत घालत असतात. अनेकांची तर पोलिसांची कॉलर पकडण्यापर्यंत मजल जाते. अशा साऱ्या घटना आता कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त होणार आहेत.



रेकॉर्डिंग होत असताना व्हायब्रेशन सिग्नल असणार आहे. आता दोन्ही प्रकारच्या या कॅमेऱ्यांत ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंगची सोय असणार आहे. हा कॅमेरा सीसीटीव्हीसारखा काम करणारा असून, तो मूव्हेबल असणार आहे.चेक पॉईंट व वाहतूक नियंत्रणासाठी तो वापरला जाणार असल्याचे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या आठ दिवसांत सोलापूर वाहतूक शाखेस हे कॅमेरे मिळणार असल्याचे देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.असे काम करणार बॉडी कॅमेरा बॉडी वोर्न कॅमेरा वाहतूक पोलिसांच्या शर्टावर लावला जाणार आहे. खिशाला किंवा खांद्याच्या बाजूला असणार आहे. याचे वजन 85 ग्रॅम असणार आहे. तो वॉटरप्रूफ आहे. कॅमेऱ्यामध्ये ऑडिओ व एचडी कॅमेरा असल्याने व्हिडिओ स्पष्टपणे दिसणार आहे. हा कॅमेरा वापरणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांशी नियंत्रण कक्षातून देखील संवाद ठेवता येणार आहे.

Post a Comment

0 Comments