google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विकास कामामध्ये ज्यांनी अडथळा आणला, त्यांनी विकासाची भाषा बोलू नये ः गटनेते आनंदा माने

Breaking News

विकास कामामध्ये ज्यांनी अडथळा आणला, त्यांनी विकासाची भाषा बोलू नये ः गटनेते आनंदा माने

 विकास कामामध्ये ज्यांनी अडथळा आणला, त्यांनी विकासाची भाषा बोलू नये ः गटनेते आनंदा माने संजयनगर येथील बैठकीत उर्वरित विकासकामे पूर्ण करण्याचे दिले आश्वासन


सांगोला/प्रतिनिधी ःसांगोला शहरामध्ये आघाडीतील नगरसेवकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे गेली चार वर्षे शहराचा विकास खुंटला होता. परंतू लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या 15% निधीमधून अनेक छोटी-मोठी विकास कामे शहरामध्ये करण्यात आली. यामध्ये संजयनगर येथे जवळपास 10 लाख रूपयांचे काँक्रीटीकरण व पेव्हींग ब्लॉक टाकण्याचे काम करण्यात आले. परंतू संजयनगर येथील स्थानिक नगरसेवकांनी मुरूमाची साधी एक खेपसुध्दा या परिसरामध्ये टाकली नाही, आणि निवडणुकीच्या तोंडावर आता ते विकासाची भाषा करू लागले आहेत. परंतू अशा भूलथापांना जनतेने बळी पडू नये. तसेच विकास कामांमध्ये ज्यांनी अडथळा आणला अशा लोकांनी विकासाची भाषा बोलू नये, असे प्रतिपादन महायुतीचे गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने यांनी संजयनगर याठिकाणी बोलताना केले.


शहराच्या विकासकामांना सभागृहामध्ये आघाडीकडून विरोध होत असल्याकारणाने लोकनियुक्त नगराध्यक्षा यांच्या 15% निधीमधून विविध ठिकाणी विकासकामे करण्यात आली. यामध्ये संजयनगर या ठिकाणी सखुबाई कदम ते बाबू इंगोले घरापर्यंत पेव्हींग ब्लॉक टाकणे- रक्कम रू. 1 लाख 98 हजार 26 रू, लहु लोहार ते बबन रणदिवे घरापर्यंत पेव्हींग ब्लॉक टाकणे- रक्कम रू. 1 लाख 19 हजार 277 रू, शाम दुर्गा चव्हाण ते मोहन चव्हाण घरापर्यंत पेव्हींग ब्लॉक टाकणे- रक्कम रू. 1 लाख 99 हजार 640 रू, भिकू चव्हाण घर ते आण्णा निंबाळकर घरापर्यंत पेव्हींग ब्लॉक टाकणे- रक्कम रू. 1 लाख 98 हजार 400 रू अशी विकास कामे करण्यात आली आहेत. त्याचबरोबर सोलापूर विधानपरिषदेचे आमदार प्रशांत(मालक) परिचारक यांच्या फंडामधून हायमास्ट दिवासुध्दा बसविण्यात आला आहे.


यासोबत याठिकाणी काही नवीन विकासकामे सुध्दा लवकरच करण्यात येणार आहेत. यामध्ये संजयनगर येथे बायपास रोड माने घर ते तारळेकर घर रस्ता काँक्रीटीकरण करणे, संजयनगर येथे बायपास रोड माने घर ते तारळेकर घर पेव्हींग ब्लॉक टाकणे, संजयनगर मधील अंतर्गत गटारी दुरूस्ती करणे, रमजान जातकर घर ते पंजाब चव्हाण घरापर्यंत आरसीसी गटार करणे, रमजान जातकर घर ते पंजाब चव्हाण घरापर्यंत बोळ काँक्रीटीकरण करणे, रमजान जातकर घर येथे लाईट पोल बसविणे, विशाल घुटूकडे घर ते अंकुश लोहार घर आरसीसी गटार करणे, विशाल घुटूकडे घर ते अंकुश लोहार घर रस्ता काँक्रीटीकरण करणे या विकासकामांना येणार्‍या स्थायी समितीच्या मिटींगमध्ये मंजूरी देवून ती लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचेही यावेळी नगरसेवक आनंदा माने यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments