google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला यांच्यावतीने शिक्षिकांचा सत्कार करून शिक्षक दिन साजरा

Breaking News

धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला यांच्यावतीने शिक्षिकांचा सत्कार करून शिक्षक दिन साजरा

 धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला यांच्यावतीने शिक्षिकांचा सत्कार करून शिक्षक दिन साजरा


सांगोला/प्रतिनिधी ःदि. 08 सप्टेंबर 2021 रोजी धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला यांच्यावतीने शिक्षिकांचा सत्कार धनगर गल्ली येथील समाजमंदिरामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.सुरूवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, मिनाक्षी येडगे, मिनाक्षी गडदे, अश्विनी पुजारी, प्रियांका श्रीराम, अनिता जानकर, ज्योती चोरमुले, नकुशा जानकर, रेश्मा गावडे, अनिता मदने व ज्येष्ठ सदस्या आशा सलगर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षिकांमध्ये सुनिता गडदे, कांचन मदने, आक्काताई जानकर, बेबीताई अनुसे, जयश्री खांडेकर, महानंदा मासाळ, आशा सलगर मॅडम तसेच ग्रुपच्या सदस्या ज्योती चोरमुले, दिपाली सरगर, अश्विनी पुजारी, अनिता जानकर, संस्कृती लवटे, शिला माने आदी महिलांचा सत्कार ग्रुपच्या वतीने करण्यात आला.

नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी तसेच शिक्षिका महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच 5 सप्टेंबर रोजी ऑनलाईन घेतलेल्या माझी आई- माझा गुरू या उपक्रमातील सर्व आईंचा गु्रपच्या वतीने सत्कार करण्यात आला. बालदहिहंडी कार्यक्रमातील सर्व बालकलाकारांना ग्रुपच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.शिक्षिकांसाठी जनरल नॉलेजचे प्रश्न, लकी ड्रॉ, संगीत खुर्ची खेळ घेण्यात आले. यामध्ये कांचन आण्णासाहेब मदने व महानंदा अर्जुन मासाळ मॅडम विजयी होवून बक्षीसाच्या मानकर ठरल्या. शिक्षिकांनी विविध उखाणे घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

सदर कार्यक्रमासाठी सर्व महिला शिक्षिका, नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, मिनाक्षी येडगे, दिपाली सरगर, मिनाक्षी गडदे, आशा सलगर, नकुशा जानकर, रेश्मा गावडे, अनिता जानकर, ज्योती चोरमुले, प्रियांका श्रीराम, अश्विनी पुजारी, अनिता मदने, शिला माने, निलाबाई वाघमोडे आजी, कौशल्या गावडे, संस्कृती लवटे आदी महिला सदस्या उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती लवटे यांनी केले तर आभार सचिव मिनाक्षी गडदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments