google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 घातल्या ' बेड्या ' ! ' मानवाधिकार'च्या 7 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी का केली अटक ? जाणून घ्या सविस्तर

Breaking News

घातल्या ' बेड्या ' ! ' मानवाधिकार'च्या 7 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी का केली अटक ? जाणून घ्या सविस्तर

 ' त्यांनी पोलिसांना बोलावले ' अन् पोलिसांनीच घातल्या ' बेड्या ' ! ' मानवाधिकार'च्या 7 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी का केली अटक ? जाणून घ्या सविस्तर 


पुणे :  मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगून किराणा दुकानदाराला भेसळ करता म्हणून धमकाविले . रुबाब दाखविण्यासाठी त्यांनी पोलिसांना पाचारण केले . पण , तो डाव त्यांच्यावरच उलटला . पोलिसांनी खंडणी उकळणाऱ्या या कथीत मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक  केली आहे . हेमंत निवगुणे , कपिल राक्षे , आदित्य जेधे , तानाजी मस्तुद , किरण घोलप , सतीश केदारी , ज्योस्त्ना पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत . ७ याप्रकरणी सुरजाराम रुपाराम चौधरी  वय ३७ , रा . तळेगाव दाभाडे  यांनी वाकड पोलिसांकडे  फिर्याद दिली आहे . 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , चौधरी यांचे रहाटणी येथील रामनगरमध्ये बालाजी ट्रेडर्स या नावाचे किराणा दुकान आहे . त्यांच्या दुकानात १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ७ जण आले . आम्ही मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे त्यांनी चौधरी यांना सांगितले . तुम्ही धान्यात भेसळ करता अशी आमच्याकडे माहिती आहे . तुम्हाला आणि तुमच्या भावाला १० वर्षे जेलमध्ये पाठवून , अशी धमकी त्यांनी दिली .हे करायचे नसेल तर आम्हाला २५ लाख रुपये द्यावे लागतील , असे सांगितले . चौधरी यांनी पैसे देण्यास नकार दिला . त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावाच्या खिशातील ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले . त्यानंतर ते शनिवारी पुन्हा आले . त्यांनी २ लाख रुपयांची मागणी केली . नाही तर पोलिसांना बोलावतो , असे सांगितले . त्यांच्यावर रुबाब दाखविण्यासाठी त्यांनी पोलिसांना बोलावले . वाकड पोलीस  तातडीने दुकानात आले . तेव्हा चौधरी यांनी आपल्याकडे हे खंडणी मागत असल्याचे सांगितले . भावाच्या खिशातील ८ हजार ५०० रुपये घेऊन गेल्याचे सांगितले . त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सातही जणांना अटक केली .

Post a Comment

0 Comments