आबासाहेबानीं आबादीत ठेवलेला सामाजिक सलोखा व शांतता आणि सुव्यवस्था टिकवणे हीच खरी श्रद्धांजली.. नगरसेवक सुरजदादा बनसोडे
स्व. मा. आम. गणपतराव देशमुख यांची सर्वपक्षीय शोकसभा संपन्न
सांगोला/प्रतिनिधी :स्व. मा. आम. गणपतराव देशमुख यांची सर्वपक्षीय शोकसभा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे शनिवार दि. 11 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. सदर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन आरपीआयचे नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी केले होते.
या शोकसभेत सांगोला शहरातील व तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून आबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आपल्या श्रद्धांजलीपर मनोगतात नगरसेवक सुरज दादा बनसोडे म्हणाले की, आबासाहेबांच्या जाण्यामुळे सांगोला तालुक्यातील सामाजिक सलोख्याची खूप मोठी हानी झाली आहे. ती टिकवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. त्यांना वैयक्तिक आलेले अनुभव मनोगत व्यक्त करता यावे यासाठी श्रद्धांजलीपर शोकसभा आयोजित केली होती.
पुढे सुरज दादा बनसोडे म्हणाले आबासाहेबांनी सांगोला तालुक्यांमध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून त्याचे राजकारण कधीही केले नाही. आबासाहेबांनी सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी, दिन दुबळा, दलित, मुस्लिम यांना केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर राजकारण न करता समाजकारण केले. म्हणूनच सांगोला तालुक्याच्या जनतेने त्यांना तब्बल 11 वेळा निवडून दिले. आबासाहेबांच्या जाण्याने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी हताश न होता आबासाहेबांचा आदर्श व विचार डोळ्यासमोर ठेवून जोमाने कामाला लागावे. आबासाहेबांच्या निधनामुळे शेतकरी कामगार पक्षातील नेते आपापसातले मतभेद विसरून कोणाचे तरी एकाचे नेतृत्व स्वीकारून कामाला लागल्यावर आबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही.
आपापसातील मतभेद व काही नेत्यांच्या चुकीमुळे विधानसभेला शेतकरी कामगार पक्षाला पराभवास सामोरे जावे लागले. म्हणून सांगोला तालुक्यातील व शहरातील शांतता व सुव्यवस्था आबाधित ठेवायची असेल तर शेतकरी कामगार पक्षाने त्यांच्याशी निगडित समविचारी पक्ष व सामाजिक संघटना यांना बरोबर घेऊन येणाऱ्या सर्व निवडणुका सर्व ताकदीनिशी लढवाव्यात. शिवाय आबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा विषयी मा. नगराध्यक्षा यांच्याकडे दिनांक 10 ऑगस्ट रोजी आबासाहेबांचा पुतळा बसवण्याच्या ठरावा संदर्भात सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय व्हवा असा विनंती अर्ज दिला आहे.
तरी नगराध्यक्षांनी तो विषय सर्वसाधारण सभेत घेऊन त्याच्यावर साधक-बाधक चर्चा करून सदरच्या पुतळा बसवण्या संदर्भात ठराव मंजूर करून घ्यावा. आबासाहेबांनी सांगोला तालुक्यांमध्ये राजकारण करत असताना कुठल्या विशिष्ट जातीला किंवा व्यक्तीला विरोध न करता व्यक्तीच्या अंगी असलेल्या वाईट प्रवृत्तीला विरोध केला. सांगोला तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या उपजीविकेसाठी त्यांनी विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून आबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी आरपीआयचे नगरसेवक सुरज दादा बनसोडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख, शेतकरी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन प्रा. नानासाहेब लीगाडे, शेकाप सरचिटणीस चंद्रकांत शिंदे, गटनेते आनंदा माने, सभापती राणीताई कोळवले, उपसभापती नारायण जगताप, काँग्रेस ता. अध्यक्ष सुनील भोरे सर, मा. उपनगराध्यक्षा स्वातीताई मगर, नगरसेवक अस्मीर तांबोळी,
मा. नगरसेवक माऊली तेली, नगरसेवक सुरेश आप्पा माळी, नगरसेवक गजानन बनकर, मा. नगराध्यक्ष मारूती आबा बनकर, मा. सभापती बाळासाहेब काटकर, मा. उपसभापती संतोष देवकते, ऍड ढाळे, नगरसेवक रफिक तांबोळी, जि. प. सदस्य अतुल मालक पवार, जी.प. सदस्य संगम धांडोरे, जि. प. सदस्य सचिन देशमुख, मा. उपसभापती तानाजी चंदनशिवे, बाळासाहेब एरंडे, हरिभाऊ पाटील, चंद्रकांत सरतापे, ऍड गजानन भाकरे, राजू मगर, आरपीआय ता. अध्यक्ष दीपक होवाळ, कार्याध्यक्ष स्वप्नील सावंत, कडलास आरपीआय सरपंच दिगंबर भजनावळे, आणा गस्ते, चंदू मोरे, युवक नेते नरेश बनसोडे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर, हनमंत कोळवले, विष्णू देशमुख, मायाप्पा यमगर, नागेश जोशी, सरपंच विजय दादा खांडेकर, शहाजी गडहिरे, राहुल मस्के, दत्ता जानकर, गुणवंत जगधने, पोपट तोरणे, लखन माने, भारत खंदारे, गोट्या लोखंडे, विनायक गंगणे, राजेंद्र ठोकळे, देवराज बनसोडे, किशोर झेंडे, निखिल गडहिरे इत्यादी शेकाप पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments