google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा लसीकरणात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

Breaking News

सोलापूर जिल्हा लसीकरणात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

 सोलापूर जिल्हा लसीकरणात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर


सोलापूर : पुण्यानंतर सोलापूर जिल्हा राज्यात लसीकरणामध्ये दोन नंबरवर आला आहे. मुंबई, अहमदनगर आणि नाशिक हे अनुक्रमे 3, 4 आणि 5 वर आले आहेत.सर्वाधिक लसीकरण करण्यात राज्यात सोलापूर जिल्हा हा दुसऱ्या नंबर असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.


दिलीप स्वामी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदृप येथील तसेच आरोग्य पथक बरूर येथील लसीकरण केंद्रावर भेट देऊन आजच्या मेगा लसीकरण मोहिमेचा आढावा घेऊन लसीकरण कार्यक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. वास्तविक पाहता गणपती उत्सव व घरोघरी गौरींच्या आगमनाची तयारीची लगबग सुरू असताना काल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला नागरीकांकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याबद्दल दिलीप स्वामी यांनी यावेळी नागरीकांचे देखील आभार मानले.


या संपूर्ण कार्यक्रमावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे लक्ष ठेवून होते. दोन दिवसांपासुन या मोहिमेसाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी हे आरोग्य प्रशासनास मार्गदर्शन करीत आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाने सातत्याने लसीबाबत पाठपुरावा केल्याने आतापर्यंत 55 वेळा कोविशिल्डची लस 14 लाख 22 हजार 840 तर 28 वेळा कोवॅक्सिनची लस 82 हजार 640 इतकी आली. त्यातून ऑगस्टअखेर 11 लाख 74 हजार 310 पहिला तर 4 लाख 39 हजार 720 जणांना दुसरा दुसरा डोस देण्यात आला, अशाप्रकारे जिल्ह्यात ऑगस्टअखेर एकूण लसीकरण 16 लाख 14 हजार 30 इतकी झाले आहे.


सप्टेंबर महिन्यात बुधवारी 77 हजार 840 इतके विक्रमी लसीकरण झाले.त्यात भर होऊन 11 सप्टेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत 16 लाख 97 हजार 750 इतके विक्रमी लसीकरण सोलापुर शहर जिल्ह्यात झाले. त्यामुळे राज्यात पुणे एक नंबरवर तर सोलापूर दोन नंबर , मुंबई , अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यात विक्रमी लसीकरण झाले आहे

Post a Comment

0 Comments