google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोले येथे शेकापक्षाच्या राज्याच्या मध्यवर्ती कमिटीची शनिवारी व रविवारी बैठक

Breaking News

सांगोले येथे शेकापक्षाच्या राज्याच्या मध्यवर्ती कमिटीची शनिवारी व रविवारी बैठक

 सांगोले येथे शेकापक्षाच्या राज्याच्या मध्यवर्ती कमिटीची शनिवारी व रविवारी बैठक


सांगोला प्रतिनिधी:- स्व भाई गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांच्या दुःखद निधनानंतर प्रथमच सांगोले येथे शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कमेटिची बैठक शनिवार दि २५/९/२०२१ रोजी व रविवार दि २६/९/२०२१ रोजी दोन दिवस मिरज रोड लगत “हार्षदा लाँन्स “सांगोले येथे  चालणार आहे.सदर बैठकीस राज्यातील शेकापक्षाचे राज्य सरचिटणिस भाई जयंत पाटिल यांचे सहीत आनेक नेते मंडळी व पदाधीकारी उपस्थीत रहाणार आहेत.


शेकापक्षाच्या मध्यवर्तीच्या बैठकीमध्ये  राज्यातील सध्याची सर्व राजकीय  पक्षामधील राजकीय आस्थीरता व  नको त्या विषयावरील वाद विवाद व महत्वपुर्ण विषयाला सत्ताधारी देत आसलेली जाणुन बुजुन बगल आश्या परस्थीतीत फक्त शेकापक्ष सामांन्याचा पक्ष,गरीबांचा पक्ष,शेतकर्यांचा पक्ष ,कष्ठकर्यांचा पक्ष म्हणुन आपली बांधीलकी जपत आसताना शेकापक्षाची पक्षाची परंपरा व आचारसंहीता पाळुन आसलेली भुमीका ,शेतकर्यांचे प्रश्न,महिलांचे प्रश्न,दलीतांचे प्रश्न,श्रमीकांचे प्रश्न ह्या वरती सखोल चर्चा ह्या दोन दिवसीय बैठकीमध्ये होणार आहे .

मध्यवर्तीच्या पहिल्या दिवशी शनिवार दि २५ सप्टेंबर रोजी राज्याचे चिटणीस मंडळ,व मध्यवर्ती चे सदस्य एवढेच सहभाग नोंदवणार आहेत.पहिला दिवस फक्त त्यांच्या चर्चे साठीच ठेवलेला आहे.त्या मध्ये आनेक प्रश्नावर चर्चा होणार आहे  त्या मध्ये पक्ष  संघटना, राज्यातील आडचणीत आसलेला शेतकरी यांच्या वरील संकटे ह्यावरती चर्चा होणार आहे,राज्यामध्ये महिलांनवरील होत आसलेले  आन्याय,तसेच कोरोना कळात आर्थीक आडचणीमध्ये सापडलेले लहान सहान व्यवसायीक यांचे मुलभुत विषयावरती व आनेक महत्व पुर्ण विषयावर चर्चा होणार आहे.


रविवार दि २६/९/२०२१ रोजी दुपारी १=०० वाजता शेकापक्षाचे राज्य सरचिटणिस भाई जयंत पाटिल व जेष्ठ व आभ्यासु नेते भाई एस. व्हि .जाधव हे मार्गदर्शन करणार आहेत.त्या वेळी राज्यातील विविध प्रश्नावरती शेकापक्षाची भुमीका मांडणार आहेत.व शेतकर्यांच्या श्रमिकांच्या ,दलितांच्या व लहान व्यवसायीकांच्या प्रश्नावरती आंदोलन करण्याची सुध्दा चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे.


रविवार दि २६/९/२०२१ रोजी दुपारी १=०० वाजता जिल्ह्यातील व तालुक्यातील शेकापक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या कार्यकरत्यांनी व हितचिंतकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन शेकापक्षाचे नेते भाई चंद्रकांत देशमुख, तालुका चिटणिस भाई विठ्ठलराव शिंदे चिटणीस मंडळाचे राज्याचे सदस्य बाबासाहेब करांडे,मध्यवर्तीचे सदस्य भाई नानासाहेब लिगाडे,भाई,बाळासाहेब काटकर,भाई सचिन देशमुख,भाई अजित गावडे,भाई चिदानंद स्वामी यांनी बैठकीमध्ये केले.त्यावेळेस युवा नेते डाँ बाबासाहेब देशमुख,युवा नेते अनिकेत देशमुख तसेच जि प सदस्य ,सभापती ,उपसभापती,पंचायत समीती सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थीत होते.

जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व शेकापक्षाच्या पदाधिकारी,नेते ,सरपंच,पुरोगामीचे पदाधीकारी बहुसंख्य  कार्यकर्ते दुसर्या दिवशीच्या रविवारच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येने उपस्थीत रहाणार आसल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments