लॉजच्या रूममध्ये विवाहित प्रेमी युगुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात घटना
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.विवाहित प्रेमी युगुलाने लॉजच्या रूममध्ये दोरी व ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर महामार्गावर लांबोटी गावाच्या हद्दीत दिनेश रामचंद्र गाडे (रा.मोहोळ) यांच्या मालकीचा ‘रॉयल-इन-वन रेस्टारंट अँड लॉजिंग’ नवणारे परमीटरुमचा व्यवसाय आहे. सोमवार रोजी सायकांळी साडेसहाच्या सुमारास अश्विनी बिराप्पा पुजारी व धनजंय बाळु गायकवाड (रा. लोणीकंद, ता.हवेली, जि.पुणे) हे दोघेजण सदर हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आले.
लॉजच्या काउंटरवर रीतसर ओळखपत्र प्रत घेऊन रूमसाठी नोंदणी करून या जोडप्यास रूम देण्यात आली.हॉटेल कामगार माधव दत्तात्रय सोनसाळे याने या जोडप्यास रूम उघडून दिली व रात्री पावणे बाराच्या सुमारास आम्हाला जेवण पाठवून द्या असे या जोडप्याने माधव यास सांगितले. सांगितल्याप्रमाणे माधव सोनसाळे हा जेवण देण्याकरता रूमजवळ गेला व दरवाज्याबाहेरची बेल वाजवली, बऱ्याचदा बेल वाजवूनही आतून काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे शंका आल्याने त्याने रूमच्या खिडकीतून आतमध्ये पहिले असता, धनंजय बाळू गायकवाड व अश्विनी बिराप्पा पुजारी यांनी गळफास घेतल्याचे सोनसाळे याला आढळून आले. सदर घटनेची माहिती सोनसाळे याने हॉटेल मालक अनिल गाडे याला दिली. त्यावेळी गाडे व त्याचा मित्र वैभव बाळासाहेब कदम या दोघांनी देखील घटनेची पाहणी केली, यावेळी आतून कडी लावली असल्याचे व अश्विनी व धनजंय यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेबाबत अनिल गाडे याने मोहोळ पोलीस स्टेशनला येऊन घटनेची माहिती दिली. मोहोळ पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रूमचा दरवाजा तोडून आत्महत्या केलेल्या दोघांना पाहीले असता अश्विनी पुजारी हीने दोरीच्या साहाय्याने तर धनंजय गायकवाड याने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यावेळी अश्वीनी हीच्या गळ्याची दोरी तुटल्याने ती खाली पडली होती. तर, धनंजय हा तसाच लटकलेला होता व त्याचे दोन्ही पाय अश्वीनीच्या शरीराला स्पर्श झाले होते. अश्विनी पुजारी व धनंजय गायकवाड हे दोघेही विवाहीत असुन दोघांचाही आपआपल्या घरी सुखी संसार सुरू होता.
0 Comments