सरकारी शाळांतील मुलांना मिळणार मोफत जेवण, नव्या योजनेची घोषणा..!
केंद्र सरकारने आज (ता. 29) 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' योजनेची घोषणा केली. त्यानुसार देशातील 11.2 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना 5 वर्षे दुपारचं जेवण विनामूल्य दिलं जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार 1.31 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज कॅबिनेटची बैठक झाली. तीत देशातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. सध्या देशात सुरू असलेल्या 'मिड-डे मील' योजनेची जागा ही नवी योजना घेणार आहे. राज्य सरकारांच्या मदतीने केंद्र सरकार या योजनेची अंमलबजावणी करील. अर्थात त्यात सर्वाधिक वाटा केंद्र सरकारचाच असेल, असे मंत्री ठाकूर यांनी सांगितले. केंद्र सरकार या योजनेसाठी अतिरिक्त निधी देणार आहे. सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांना त्याचा लाभ होईल. तसेच शासकीय अनुदानित शाळांमध्येही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शिक्षणासह पोषण आहार
देशातील 11 लाख 20 हजार कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातील करोडो मुलांना शिक्षणासह चांगला पोषण आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू केली जात आहे. त्यामुळे शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.
0 Comments