google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पतीच्या निधनानंतर 33 वर्षीय पत्नीची आत्महत्या; मंगळवेढयातील दाम्पत्याचा करुण अंत

Breaking News

पतीच्या निधनानंतर 33 वर्षीय पत्नीची आत्महत्या; मंगळवेढयातील दाम्पत्याचा करुण अंत

 पतीच्या निधनानंतर 33 वर्षीय पत्नीची आत्महत्या; मंगळवेढयातील दाम्पत्याचा करुण अंत 


पतीच्या निधनानंतर पत्नीनेही रेल्वे खाली येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे. 38 वर्षीय पतीचा आजारपणात मृत्यू झाल्यानंतर 33 वर्षीय पत्नीनेही आपलं आयुष्य संपवलं. मयत दाम्पत्य मूळ मंगळवेढा तालुक्यातील शरदनगर (मल्लेवाडी) येथील रहिवासी होते. आप्पासो रावसाहेब कोरे (वय.38 ) अस पतीचं नाव आहे तर अनुसया आप्पासो कोरे ( वय.33 ) असे पत्नीचे नाव आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या आठ दिवसापूर्वी मयत आप्पासो कोरे याला निमोनिया आजार असल्यामुळे सोलापूर येथील यशोधरा या रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान अप्पासो कोरे हे आज पहाटे 5 च्या सुमारास मयत झाले. पतीच्या निधनाचा धक्का पत्नी अनुसया यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी सोलापूर-पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वेच्या खाली येऊन आत्महत्या केली आहे. कोरे दाम्पत्याना एक पाच वर्षाचा मुलगा असून या घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी प्रल्हाद चव्हाण हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments