मेगा कोविड लसीकरण नियोजन बाबत महत्त्व पूर्ण सूचना
सर्व गट विकास अधिकारी/गट शिक्षण अधिकारी/बाल विकास प्रकल्प अधिकारी /तालुका आरोग्य अधिकारी उद्या सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मेगा कोविड लसीकरण मोहीम गणेश फेस्टिव्हल निमित्ताने आयोजित करण्यात आलेली आहे...
या मोहिमेमध्ये उद्या आपण 2 लाख नागरिकांचे लसीकरण एकाच दिवसात पूर्ण करणार आहोत...आरोग्य विभागाकडील मनुष्यबळ लस देण्यासाठी गुंतणार असल्याने व एका दिवसात विक्रमी लसीकरण पूर्ण करावयाचे असल्याने इतर विभागाची मदत आरोग्य विभागास आवश्यक आहे...तरी यासाठी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेल्या गावामध्ये स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी(ग्रामसेवक/डेटा ऑपरेटर) ,स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक ,स्थानिक सर्व अंगणवाडी सेविका यांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून आरोग्य विभागास खालील प्रमाणे मदत करावयाची आहे...
1.लसीकरण केंद्रावरील गर्दीवर नियंत्रण ठेवणे.
2.अशिक्षित नागरिकांचे cowin पोर्टल वर सेल्फ रजिस्ट्रेशन करणे..
3.आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण च्या cowin पोर्टल वर ऑनलाईन नोंदणीसाठी मदत करणे. 100% टक्के ऑनलाईन नोंदणी बंधनकारक आहे.
4.गावामध्ये दवंडी देऊन जास्तीस्त जास्त नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन करणे..
5.स्थानिक गणेश मंडळ/स्वयंसेवी संस्था यांची मदत उपलब्ध करून देणे.
6.लसीकरण सत्राच्या ठिकाणी आवश्यक नुसार sanitiser, AD syringe /डिस्पो सिरिंज,पिण्याचे पाणी, पाऊस आल्यास पुरेसा निवारा उपलब्ध करणे बाबत ग्रामपंचायत यांनी जबाबदारी पार पाडावी...
वरील प्रमाणे कार्यवाही होईल याची दक्षता गटविकास अधिकारी/गट शिक्षण अधिकारी/बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी घ्यावी.तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडून उद्याच्या लसीकरण मोहिमेचे नियोजन प्राप्त करून घ्यावे..याबाबत मी स्वतः तालुका आरोग्य अधिकारी यांचा उद्या संध्याकाळी 8:00 वा vc द्वारे आढावा घेणार आहे..
(दिलीप स्वामी)
मुख्य कार्यकारी अधिकारी
जि प सोलापूर
0 Comments