दोन दिवसापासून बेपत्ता होती ती..! तिने स्वतःचाही जीव संपवला आणि दोन वर्षाच्या चिमुरड्याचा देखील...¡
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेने तिच्या दोन वर्षांच्या मुलासह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे आज संध्याकाळी उघडकीस आले आहे हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथे हा प्रकार घडला. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे यासंदर्भात लोणी काळभोर पोलिसांनी अधिक माहिती दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या भेकराईनगर येथे राहणाऱ्या कविता देविदास भोसले (वय 30) या विवाहितेने प्रणित देविदास भोसले (वय 2 वर्ष) या लहान मुलासह आत्महत्या केली.
कविता भोसले आपल्या मुलासह मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होती. कविताच्या नातेवाईकांनी यासंदर्भात हडपसर पोलीसांना तिच्या बेपत्ता होण्याची खबर दिली होती. यादरम्यान हडपसर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण द्वारे शोध घेतला असता, कविता हिचे शेवटचे मोबाईल फोनचे ठिकाण आळंदी म्हातोबा येथील असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी शोध घेतला.
या दरम्यान गायकवाड वस्ती येथील एका विहिरीत एका महिलेचा मृतदेह आज संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी पाहणी केली. तेव्हा कविता व तिच्या मुलाचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. कविताच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. लोणी काळभोर पोलिस पुढील तपास करत आहेत
0 Comments