मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर गुप्तांगावर वार !
मुंबई – साकीनाका परिसरात 32 वर्षीय महिलसेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात सळई टाकण्याच संतापजनक कृत्य केलं.या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. पुण्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कारासारख्या हादरवणाऱ्या तीन घटना ताज्या असताना आता मुंबईतही अशा प्रकारची घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे
मुंबईतील घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ती अद्यापही बेशुद्ध आहे. तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टर मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत. संबंधित घटना ही दहा वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कारासारखी आहे. त्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. पोलीस आता नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं आवश्यक आहे.
0 Comments