google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरामध्ये 217 लाईट पोल टाकण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न

Breaking News

सांगोला शहरामध्ये 217 लाईट पोल टाकण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न

 सांगोला शहरामध्ये 217 लाईट पोल टाकण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न


सांगोला/प्रतिनिधी ःसांगोला शहरामध्ये विविध ठिकाणी 217 लाईटचे पोल उभे करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ गुरूवारी संपन्न झाला. सुमारे 27 लाख रू. निधी 14 व्या वित्त आयोग निधीअंतर्गत या कामासाठी नगरपरिषदेस प्राप्त झाला आहे. हे काम सुरू करण्यात आले असून लवकरच अंदाजपत्रकानुसार सर्व ठिकाणी पोल उभे केले जाणार आहेत. 


यामध्ये विलास आप्पा लादे-शिवाजीनगर- 7 पोल, म्हाळाप्पा नामदेव नायकुडे- चिंचोली रोड- 7 पोल, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ- राऊत मळा- 7 पोल, उत्तम नामदेव बुरांडे- सावे रोड- 10 पोल, रमेश केराप्पा नलवडे- अलराईन नगर- 10 पोल, भिवा शंकर साठे- साठेनगर- 2 पोल, नागेश मुरलीधर चांडोले- चांडोलेवाडी- 2 पोल, विष्णू विठ्ठल ढेरे- गावडे मळा- 5 पोल, नारायण परशुराम बामणे व प्रभू मेटकरी- बिलेवाडी- 15 पोल, ज्ञानेश्वर भास्कर पवार- वाढेगांव रोड- 2 पोल, सत्यभामाबाई जावीर- चांडोले सावंतवस्ती- 2 पोल, ईश्वर माने- सावे रोड- 1 पोल, कल्याण कांबळे- जांगळे वस्ती- 10 पोल, अरूण शिवलिंग चांदणे- जांगळे वस्ती- 5 पोल, कोपटे वस्ती ओढा ते सावे रोड- कोपटे वस्ती- 11 पोल, उध्दव विठ्ठल घाडगे- घाडगे वस्ती- 4 पोल, सुकदेव जांगळे ते शईद शेख- वासूद रोड- 10 पोल, महेंद्र रामचंद्र तोडकरी- वासूद रोड- 4 पोल, चांडोलेवाडी चौक ते नाला- चांडोलेवाडी- 7 पोल, महादेव वाघमारे ते डॉ. माळी- तळ्यातील राऊत मळा- 12 पोल, कडलास रोड ते भुईटे वस्ती- कडलास रोड- 10 पोल, पंढरपूर रोड ते सखाराम जानकर- पंढरपूर रोड- 10 पोल, विलास शेंबडे व वामन शेंबडे- शेंबडेवस्ती- 3 पोल, आप्पासाहेब पाटील ते श्रीकांत पाटील- पाटील वस्ती- 6 पोल, तानाजी पाटील घर ते ढोले मळा कोपटे वस्ती- कोपटे वस्ती- 20 पोल, मणेरी वस्ती ते कोपटे वस्ती- कोपटेवस्ती- 20 पोल, करंजाई देवी ते शिवाजी सावंत- जांगळे वस्ती- 8 पोल, राजू माने ते सोपान बनसोडे घरापर्यंत- भिमनगर- 4 पोल, उत्कर्ष शाळेजवळ नागनाथ गयाळी ते रवी चौगुले घराजवळ- उत्कर्ष शाळेजवळ- 3 पोल असे एकूण 217 पोल शहरामध्ये वरील ठिकाणी उभे करण्यात येणार आहेत.


शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. अनुराधा खडतरे, गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने, नगरसेवक चेतनसिंह केदार-सावंत, दादा खडतरे, सचिन सुरवसे, यतिराज सुरवसे सर, तानाजी सुरवसे, मधुकर केदार, पोपट केदार, पांडूरंग भुईटे, शिवाजी भुईटे, दगडू भुईटे, शनी भुईटे, सुरज लवटे, आण्णासो केदार, पांडूरंग माने यांच्यासह तेथील स्थानिक नागरिक व इतर तरूण वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments