धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या वतीने बाल-दहिहंडी व मंगळागौरीचा कार्यक्रम संपन्न
सांगोला/प्रतिनिधी ःधनगर समाजसेवा महिला मंडळाच्या वतीने बाल- दहिहंडी धनगर गल्ली येथील समाज मंदिरामध्ये साजरी करण्यात आली. बालचमुंनी कृष्ण, राधा, गवळणी वेशभूषेत येवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यामध्ये गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोविंदा आला रे.., यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी कान्हा वाजवी बासरी.. या गीतांवर नृत्य-नाट्य करण्यात आले.
सदर बाल-दहिहंडीमध्ये राजवीर भिमराव लवटे, साई दिपक श्रीराम, ओम दिपक श्रीराम, सार्थक दिलीप जानकर, प्रतिक्षा काशिलिंग गावडे, आरोही अनिल मदने, आरव अनिल मदने, पार्थ बाळासाहेब चोरमुले, राजवीर विजय कोळेकर, राणाप्रताप विजय कोळेकर, दिवीजा राजेंद्र झंजे, सोहम सुर्यकांत मेटकरी, हर्ष देविदास गावडे, प्रतिम देविदास गावडे, प्रतिक्षा दत्तात्रय जानकर, श्रीशैल्य दिलीप जानकर, तनिष्का विशाल सलगर, प्रांजली बाळासाहेब चोरमुले, शर्वरी प्रशांत रूपनर, वेदिका धनंजय मस्के, सह्याद्री भिमराव लवटे आदी बालकलाकार सहभागी झाले होते.
सर्व बालकलाकारांना धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला यांचेकडून चिरमुरे, शेंगदाणे, दाळे याप्रकारचे खाऊ वाटप करण्यात आले. महानंदा मासाळ मॅडम यांनी सर्व बालचमूंना बिस्कीट पुडे, लाह्या खाऊ म्हणून दिला तर सविता कोळेकर यांनी सर्वांना केळी खाऊ म्हणून दिली.मंगळागौरीच्या विविध गाण्यावरती सर्व महिलांनी ताल धरून रिंगण, फुगड्या खेळत मनमुराद आनंद लुटला. उखाणे घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, नगरसेविका छायाताई मेटकरी, ज्येष्ठ सदस्या आशा सलगर मॅडम, महानंदा मासाळ मॅडम, अध्यक्षा मिनाक्षी येडगे, उपाध्यक्षा दिपाली सरगर, सचिन मिनाक्षी गडदे, संस्कृती लवटे, नकुशा जानकर, रेश्मा गावडे, अनिता जानकर, प्रियांका श्रीराम, ज्योती चोरमुले, प्रियांका रूपनर, कौशल्या गावडे, रूपाली मदने, सुनिता मेटकरी, सविता कोळेकर, अनिता मदने, लक्ष्मी सलगर, स्वाती लवटे, यशश्री लवटे, सुकन्या बंडगर आदी महिला उपस्थित होत्या.
0 Comments