हृदयदावक! - 20 वर्षीय तरुणीचे हातपाय बांधून बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यामधील आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका २० वर्षीय तरुणीचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी ॲट्रॉसिटी तसेच अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून नराधम आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक बनोटे व संदीप सूर्यवंशी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींनी पीडित महिला घरामध्ये एकटी असताना घरात घुसून पीडितेला मारहाण केली. त्यानंतर तिचे हातपाय तोंड बांधून तिच्यावर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडितेच्या जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. आणि काही तासांत पोलिसांनी आरोपींना अटक केली. या नराधमांना आज न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
0 Comments