विद्यार्थ्यांनो! सोलापुरात 43 केंद्रांवर होणार राज्य सेवा गट ब-संयुक्त पूर्वपरीक्षा
राज्य सेवा गट ब- संयुक्त पूर्व परीक्षेचे पोलिसांकडून ठोस नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहरातील 43 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्या ठिकाणी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद राहतील असे आदेश पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी काढले आहेत. कोरोनाच्या काळात ऑफलाइन परीक्षा होत असल्याने परीक्षार्थींचे थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे उमेदवारांनी एक तास अगोदर परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहायचे आहे. शहरातील परीक्षा केंद्रांची पोलिस ठाणेनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यात सोलापूर सोशल असोसिएशन ऍण्ड कॉमर्स कॉलेज, सिद्धेश्वर पेठ, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बाळे-बार्शी रोड, सिद्धेश्वर वूमन्स पॉलिटेक्निक कॉलेज, भवानी पेठ,
नागेश करजगी ऑर्किड ज्युनिअर कॉलेज, मुरारजी पेठ, श्री सिद्धेश्वर बालमंदिर, माध्यमिक शाळा, भवानी पेठ, भारती विद्यापीठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विजापूर रोड, संगमेश्वर महाविद्यालय, सात रस्ता, छत्रपती शिवाजी प्रशाला, मुरारजी पेठ, वि. गु. शिवदारे कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स सायन्स, जुळे सोलापूर, हिंदुस्तान कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, सिद्धेश्वर प्रशाला, सिद्धेश्वर पेठ, एस. व्ही. सी. एस. ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, एमआयडीसी, अक्कलकोट रोड, सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल, सिद्धेश्वर पेठ, वसंतराव नाईक हायस्कूल, सदर बझार, अश्विनी हॉस्पिटलजवळ,
हरिभाई देवकरण प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, डफरीन चौक, श्री दिंगबर जैन गुरुकुल हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, बाळीवेस, लोकसेवा हायस्कूल, उत्तर सदर बझार, दयानंद कॉलेज, भवानी पेठ, सौ. भू. म. पल्ली कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, साखर पेठ.
दयानंद काशिनाथ आसावा हायस्कूल, भवानी पेठ, बेगम कमरुनिस्सा कारीगर गर्ल्स हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, इंदिरा कन्या प्रशाला, शिंदे चौक, उमाबाई श्राविका हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, बुधवार पेठ, मॉडर्न हायस्कूल कॅम्प, गांधी नगर, शांती इंग्लिश मीडियम स्कूल, संतोष नगर, विजापूर रोड, संभाजीराव शिंदे प्रशाला, जुनी मिल कंपाउंड, श्री. एस. के. बिराजदार प्रशाला, शेळगी, भारतरत्न इंदिरा गांधी इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर-पुणे रोड, केगाव, सेंट जोसेफ हायस्कूल, डफरीन चौक, सखूबाई हिराचंद नेमचंद प्रशाला, गणपती घाट, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, अशोक चौक, अण्णप्पा काडादी हायस्कूल, भवानी पेठ, डी. एच. बी. सोनी कॉलेज, सैफूल, ए. आर. बुर्ला वरिष्ठ महिला महाविद्यालय रविवार पेठ, जागृती विद्यामंदिर, नेहरूनगर, श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रमशाळा, नेहरूनगर, कुचन हायस्कूल ज्यु. कॉलेज आणि श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला, सिद्धेश्वर पेठ या ठिकाणी परीक्षा होणार आहे.
0 Comments