google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांची सांगोल्यात रविवारी तातडीची बैठक !

Breaking News

भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांची सांगोल्यात रविवारी तातडीची बैठक !

 भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांची सांगोल्यात रविवारी तातडीची बैठक !


सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुकांसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात रणनीती आखणे , तालुक्यात पक्ष , संघटना मजबूत करणे , समर्थ बूथ अभियान , बूथ बांधणी , गाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता निर्माण करणे , केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे यासंदर्भात सांगोला तालुक्यातील भाजपचे नवनियुक्त पदाधिकारी , जिल्हा पदाधिकारी , 

जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , नगरसेवक , भाजप पदाधिकारी , आघाडीप्रमुख , शक्तीकेंद्र प्रमुख , बूथ प्रमुख , व भाजप कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक रविवार 15 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता हॉटेल जोतिर्लिंग वाढेगांव नाका , सांगोला या ठिकाणी आयोजित केली आहे . या बैठकीला जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख , प्रदेश कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हा सहप्रभारी के.के.पाटील , सांगोला तालुका भाजपा अध्यक्ष चेतनसिंह ( बाळासाहेब ) केदार - सावंत यांच्या उपस्थित राहून 

पदाधिकारी , कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन करणार तरी सांगोला तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी , जिल्हा पदाधिकारी , जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , नगरसेवक , भाजप पदाधिकारी , आघाडीप्रमुख , शक्तीकेंद्र प्रमुख , बूथ प्रमुख , व भाजप कार्यकर्त्यांनी रविवार 15 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता हॉटेल जोतिलौंग वाढेगाव नाका , सांगोला या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन सांगोला तालुका भाजपा अध्यक्ष चेतनसिंह ( बाळासाहेब ) केदार - सावंत यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments