मोठा दिलासा! सोलापूर ग्रामीण भागातील 'या' तालुक्यातील सर्व दुकाने उद्यापासून रात्री 10 पर्यंत सुरू राहणार
महाराष्ट्र सरकारने 15 ऑगस्ट 2021 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असलेल्या राज्यातील विविध जिल्हयात दुकाने व्यापार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार रविवार 15 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होत येत आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील
पंढरपूर , माढा , माळशिरस , करमाळा , सांगोला हे तालुके वगळून अन्य तालुक्यात निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.वाढता कोरोनाचा आकडा पाहता सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माढा , पंढरपूर , करमाळा , सांगोला , माळशिरस या पाच तालुक्यात संचारबंदी कायम ठेवली आहे
मात्र इतर सहा तालुक्यांमध्ये निर्बंध उठवण्यात आले असून सर्व दुकाने उपहारगृह हे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत.यात अक्कलकोट , बार्शी , उत्तर सोलापूर , दक्षिण सोलापूर , मंगळवेढा , मोहोळ या तालुक्यांचा समावेश आहे. सोलापूर शहरात ही निर्बंध कमी करण्यात आले आहेत. याबाबत आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.
0 Comments