google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीला प्रवेश !

Breaking News

सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीला प्रवेश !

 सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीला प्रवेश !


 महाविद्यालय स्तरावर मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना आजपासून प्रवेश दिला जाणार आहे . सोलापूर : अकरावी प्रवेशाची " सीईटी 'घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने  रद्द ठरविला . त्यामुळे आता महाविद्यालय स्तरावर मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना आजपासून प्रवेश दिला जाणार आहे . सोलापूर  शहर - जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या एकूण 76 हजार 736 जागा आहेत . त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विद्याशाखेला प्रवेश मिळेल 

अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी दिली .जिल्ह्यात अकरावीचे विज्ञान शाखेची 198 महाविद्यालये असून कला व वाणिज्य शाखेची 326 महाविद्यालये आहेत .यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा होऊ शकलेली नाही . त्यामुळे निकालाची टक्केवारी वाढली आहे . दरवर्षी एटीकेटी ( एक - दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी ) विद्यार्थ्यांसह कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा कल कला शाखेकडे असतो . 

मात्र , यंदा जवळपास 60 टक्के विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांहून अधिक गुण घेतले आहेत . त्यामुळे कला शाखेऐवजी विज्ञान , वाणिज्य शाखेसह आयटीआय , बी - फार्मसी , डिप्लोमा इन इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे .यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा होऊ शकलेली नाही . त्यामुळे निकालाची टक्केवारी वाढली आहे . दरवर्षी एटीकेटी ( एक - दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी ) विद्यार्थ्यांसह कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा कल कला शाखेकडे असतो . 

मात्र , यंदा जवळपास 60 टक्के विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांहून अधिक गुण घेतले आहेत . त्यामुळे कला शाखेऐवजी विज्ञान , वाणिज्य शाखेसह आयटीआय , बी - फार्मसी , डिप्लोमा इन इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे . या पार्श्वभूमीवर कला महाविद्यालये ओस पडण्याची भीती तेथील शिक्षकांना वाटू लागली आहे . विद्यार्थी संख्या कमी झाल्यास तुकड्या बंद पडतील आणि आपण अर्धवेळ तथा अतिरिक्त होऊ , याची चिंता त्यांना सतावू लागली आहे . दुसरीकडे , जिल्ह्यात आणखी काही महाविद्यालये प्रस्तावित असून त्यांनाही मान्यता मिळेल . अनेक महाविद्यालयांनी क्रॉप सायन्ससह अन्य अभ्यासक्रमांना मान्यता मागितली आहे 

 त्यामुळे कला शाखेतील शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार कायम राहील , असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे . दरम्यान , अकरावी प्रवेशाला पुढील आठवड्यात सुरवात होणार असून 20 सप्टेंबरनंतर अध्यापनाला सुरवात करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन आहे  " सीईटी ' रद्द झाल्यामुळे आता अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होतील . परंतु , मेरिट लिस्टनुसारच संपूर्ण प्रक्रिया राबविली जाईल . पुढील आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून सर्वांनाच त्यांच्या आवडत्या शाखेला प्रवेश मिळेल . - भास्कर बाबर , माध्यमिक शिक्षणाधिकारी , सोलापूर शाखानिहाय प्रवेश क्षमता • शास्त्र ( विज्ञान ) : 29,237 • कला ( आर्टस् ) : 36,171 शाखानिहाय प्रवेश क्षमता • शास्त्र ( विज्ञान ) : 29,237 • कला ( आर्टस् ) : 36,171 वाणिज्य ( कॉमस ) : 11,328 . एकूण : 76,736

Post a Comment

0 Comments