विज्ञान महाविद्यालयातील बी.सी.ए. भाग -२ चा निकाल १०० टक्के
सांगोला/ प्रतिनिधी- नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचा बी.सी.ए. भाग-२ सेमिस्टर -४ चा निकाल जाहीर झाला आहे. विज्ञान महाविद्यालय, सांगोलाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कु. सरगर अंजली मछिंद्र हिने ८६.८७ % एवढे मार्क्स मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर कु. शिंदे अंकिता चंद्रकांत हिने ८६.२६ % एवढे मार्क्स मिळवून महाविद्यालयात व्दितीय आली आहे. तसेच गायकवाड अभिजित आनंद हा विद्यार्थी ८५.३९ % एवढे मार्क्स मिळवून महाविद्यालयात तृतीय आला आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी ८०.०० % पेक्षा जास्त मार्क्स मिळवून पास झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. फुले आर. ए व संगणकशात्र विभागप्रमुख प्रा. कोळवले एच.डी यांनी केले आहे.
सदर विद्यार्थ्यांस प्रा. सरगर बी.आर., प्रा. रसाळ एन. एस., प्रा. शेख जे.यू., प्रा. लवटे पी.एम., प्रा.कोळवले डी.एस., प्रा. शेख एन. एस., प्रा.सौ. धुरे एम.डी., प्रा.सौ.पाटील एल.आर., डॉ. मनोहर वाघमोडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.
0 Comments