सांगोला नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.राणीताई माने यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन !
सांगोला / प्रतिनिधी ; - सनगर गल्ली याठिकाणी नगरोथान योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या सुमारे 20 लाख रुपयांच्या कामाचे तसेच नगराध्यक्षा यांच्या 15 % निधीमधून करण्यात आलेले सनगर गल्ली येथील छाया मंडले घर ते बाळासाहेब बदडे घरापर्यंत गटार व पेव्हिंग ब्लॉक बसविणे - रु . 3 लाख 21 हजार रु , नगराध्यक्षा 15 % निधी प्रल्हाद धतींगे घरासमोर काँक्रीटीकरण करणे व पेव्हिंग ब्लॉक टाकणे- 1 लाख 70 हजार रु , नगराध्यक्षा 15 % निधी सनगर गल्ली खाटीक घर येथे काँक्रीटीकरण करणे- 1 लाख 95 हजार रु . अशा कामांचे आज उदघाटन करण्यात आले . - यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ . राणीताई माने , उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर , बांधकाम सभापती सौ . अप्सराताई ठोकळे , गटनेते / नगरसेवक आनंदा माने , नगरसेविका सौ . छायाताई मेटकरी , मा.नगरसेविका विजयकाकी बनसोडे , सचिन सादिगले , सुनील धतींगे , बाबू गावडे , तुकाराम शेजाळ , अमित धतींगे , प्रल्हाद धतींगे , योगेश धतींगे , ठेकेदार राऊत , ठेकेदार शेख यांच्यासह तेथील नागरिक उपस्थित होते .
0 Comments