google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्व.आबासाहेब यांचे कार्य व विचार पुढे घेऊन जाण्याची क्षमता डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे मध्ये

Breaking News

स्व.आबासाहेब यांचे कार्य व विचार पुढे घेऊन जाण्याची क्षमता डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे मध्ये

 स्व.आबासाहेब यांचे कार्य व विचार पुढे घेऊन जाण्याची क्षमता डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे मध्ये


डॉ . बाबासाहेब देशमुख हे सध्या वेगवेगळ्या कारणाने तालुकाभर फिरत आहेत . त्यामध्ये दुःखाच्या घटना असतील तर काही सुखाचे क्षण असतील ते त्यांच्या घरी जाऊन सामील होत आहेत . स्व.आबासाहेबांच्या दुःखद जाण्याने संपुर्ण तालुका शोकसागरात बुडाला आसताना त्याचे दुःख एका बाजुला तर ज्या जनतेने पिढ्यानपिढ्या स्व . आबासाहेबांवर जिवापाड प्रेम केले , ती जनता दुसऱ्या बाजूला . अशा कठीण परस्थितीमध्ये डॉ.बाबासाहेब देशमुख हे ज्या कुटुंबाच्या घरी दुःखद घटना घडलेली आसेल त्या कुटुंबाला जाऊन धीर देत आहेत ,


 तर काही कुटुंबामध्ये लग्नसमारंभ , वास्तुशांती , उद्घाटन इत्यादी कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांच्या आनंदामध्येही सहभागी होतात . स्व . आबासाहेबांची उणीव कोणीच भरुन काढू शकत नाही . तरीही त्याच्यांवर प्रेम करणाऱ्यांसाठी त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी कोणीतरी पुढे यावे अशी भावना सगळ्यांची होती . अशा वेळी डॉ.बाबासाहेब देशमुख हे चांगल्या प्रकारे जनसेवा करतील असा विश्वास व चर्चा गावोगावी सुरु आहे.अशी तालुक्यातील जनतेमधून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे . स्व.आबासाहेबांचे काम , गाढा अभ्यास , शांत संयमी स्वभाव , शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याची पध्दत , सर्वांचे ऐकुन घेणे , साधी राहणी इत्यादी गोष्टी संपुर्ण राज्यासहित सांगोले तालुक्यातील जनतेला खडान खडा माहीत आहेत . तेच गुण व तीच छबी लोकांना डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे मध्ये दिसत आहेत .


 तसेच गावोगावचे तरुण व इतरही नागरीक स्व.आबासाहेब यांच्या निवासस्थानी रोज । येऊन डॉ . बाबासाहेबांना भेटुन जात आहेत . डॉ.बाबासाहेबांची भेट घेऊन ते सगळेजण समाधानाने गावाकडे परत फिरत आहेत . त्याच बरोबर तालुक्यातील इतर पक्षाचे नेते चर्चा करीत होते की आता शेकापक्षाच भवितव्य काय ? आसा प्रश्न उपस्थित करुन गावागावामध्ये संभ्रम तयार करीत होते . आणि आता डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या सहभागाने काहींना धडकी भरली आहे . व शेकापक्षाचे सुध्दा गावागावातील जेष्ठ नेते , कार्यकर्ते , मतदार व युवावर्गात कात टाकताना दिसत आहे . त्यांना डॉ.बाबासाहेबांमध्ये स्व . आबासाहेब दिसत आहेत .

Post a Comment

0 Comments