कायदा खात्याची गांजा लागवडीला मान्यता फाईल आरोग्य खात्याकडे : विधेयक आणण्याचीही तयारी
पणजी : राज्यात गांजा लागवडीला प्रोत्साहन द्यावे , अशा प्रकारचे सरकारचे धोरण अधिक स्पष्ट होत आहे.वैद्यकीय वापरासाठी म्हणून गांजा लागवडीला मान्यता द्यावी , असे सरकारी पातळीवर ठरत आहे . म्हणूनच कायदा खात्याने लागवडीला तत्त्वतः मान्यता दिली व त्याविषयीची फाईल पुढील प्रक्रियेसाठी आरोग्य खात्याकडे पाठविली आहे . राज्यात कधीच गांजा लागवडीला मान्यता नव्हती ; कारण एकदा मान्यता मिळाली की मग कुठेही गांजा सहज उपलब्ध होऊ शकेल , त्याद्वारे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढेल , ही सार्वत्रिक भीती आहे . गांजा लागवडीविषयीचा विषय प्रथम मुख्य सचिवांच्या स्तरावरून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे आला तेव्हा त्यांनी फाईलवर एकच शेरा मारला . राणे यांनी स्वत : वर जबाबदारी घेतली नाही कारण हा विषयवादग्रस्त ठरेल , याची त्यांना कल्पना होती . मुख्यमंत्री सावंत हेच याविषयी काय तो निर्णय घेतील , असा शेरा राणे यांनी फाईलवर मारला . फाईल त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठवून दिली . ती कायदेशीर सल्ल्यासाठी कायदा खात्याकडे गेली . कायदा खात्याने तत्त्वत : मान्यता देऊन फाईल आरोग्य खात्याकडे पाठविली आहे . दरम्यान , आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय सर्वप्रथम उजेडात आणला गांजा लागवडीला मान्यता देण्याची मोठी खेळी सरकार खेळत असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले . गोमंतकीयांना गांजाचे व्यसन लावण्याचा सरकारचा हेतू दिसतो , असे सरदेसाई म्हणाले . सरकारले फाईलवर प्रक्रिया सुरु केली . यावरुन सरकार हेतू स्पष्ट होतो , असे सरदेसाई म्हणा मुख्यमंत्री , मुख्य सचिव प्रस्तावाला अनुकूल मंत्री राणे हे सध्या मुंबईत असून ते गोव्यात परतल्यानंतर फाईलवर पुढील प्रक्रिया करु शकतात . गाज लागवडीचा विषय मंत्रिमंडळासमोर मोडावा लागेल . तसेच त्यासाठी विधेयकही तयार करावे लागेल . आरोग्यपत्री या नात्याने विधेयक विधानसभेत मांडण्याचे काम राणे यांना करावे लागेल . मात्र , राणे यान आपण विधेयक सादर करणार नाही , असे काही परिक्ष सरकारी अधिकायांना सागितले असल्याची माहिती मिळाली आहे . त्यामुळे कदाचित या विषयात पुन्हा मुख्यमंत्री सावंत यांनाच हस्तक्षेप करावा लागेल . वैयकीय वापरासाठी गाजा लागवडीला मान्यता देण्याच्या प्रस्तावाला | मुख्यमंत्री व मुख्य सचिव अनुकूल आहेत , अशी माहिती
0 Comments