बॉडीबिल्डर संकेत काळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
शिवस्मारकासाठी दे बॉडीबिल्डर संकेत काळे देणगी देऊन साजरा केला वाढदिवस
बॉडीबिल्डर, नॅशनल चॅम्पियन, महाराष्ट्र श्री मा. संकेत संजय काळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून संकेतची बहिण कु.शलाका संजय काळे हिने पहिल्या पगारातून सांगोला येथील शिवस्मारकासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये देणगी दिली. उपस्थित मान्यवरांनी संकेतचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी उद्योगपती गोपाल चोथे, आपुलकी प्रतिष्ठानचे सचिव संतोष महिमकर यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी अरविंद केदार, रमेश जाधव, सुनिल भोरे, राजू मगर, प्रविण मोहिते, बाळासाहेब शिंदे, संजय हसबनीस,नकाते साहेब, राजेंद्र यादव, रामदास काळे, नागेश भोसले, शिवाजी काशीद,महेश गवळी, तानाजी खंडागळे, दत्ता पवळ, संदेश पलसे, अरुण जगताप, किशोर केदार, डी.के.पाटील, सुहास काशीद, दिपक चोथे, म्हेत्रे गुरुजी,बिरा बंडगर, जितेंद्र बोत्रे,विजय साबळे, महादेव कोळेकर, प्रभाकर सरगर, उमेश चांडोले, तुकाराम बाबर, संजय काळे, विशाल काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments