पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधील 14 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील 14 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी हे आदेश काढले आहेत. या बदल्यांमध्ये काही जणांना मुदतवाढ देण्यात आली असून त्यांची नेमणूक अकार्यकारी पदावर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांची सध्याची नियुक्ती व पुढे नवीन ठिकाणी नियुक्ती केलेले ठिकाण
मिलिंद पाटील (सांगली ते सोलापूर ग्रामीण)
सिताराम डुबल (कोल्हापूर ते सोलापूर ग्रामीण)
तानाजी सावंत (कोल्हापूर मुदतवाढ)
राजू तशिलदार (सांगली ते कोल्हापूर)
शशिकांत पाटोळे (कोल्हापूर मुदतवाढ)
किशोर धुमाळ (सातारा मुदतवाढ)
उदय डुबल (कोल्हापूर ते सांगली)
धन्यकुमार गोडसे (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण)
रविंद्र शेळके (सांगली ते कोल्हापूर)
रवींद्र डोंगरे (सोलापूर ग्रामीण ते सांगली)
रामदास शेळके (सांगली ते सोलापूर ग्रामीण)
सतीश होडगर (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण)
राजेश गवळी (सोलापूर ग्रामीण ते कोल्हापूर)
अण्णासाहेब मांजरे (सातारा ते सांगली).
0 Comments