चारा छावण्यांचे प्रलंबित अनुदान वर्ग करण्याच्या ना.विजय वडेट्टीवार यांचेकडून सूचना डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
सांगोला ( प्रतिनिधी ) . छावणी चालकांची अडचण लक्षात घेता चारा छावणी चालकांचे १०० के अनुदान त्वरित जिल्हाधिकारी यांच्या खात्यावरती वर्ग करण्याच्या सूचना मंत्री ना . विजय वडेट्टीवार यांनी काल मुंबई येथे संपन्न झालेल्या बैठकीत दिल्या . ५० टके अनुदान त्वरित चालकांना वाटप कान उर्वरित अनुदान ताबडतोब कागदोपत्री तपासणी कान वाटप करावे , अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या.
याच्यामुळे सांगोला तालुका , सोलापूर जिल्हा व महाराष्ट्रातील छावणी चालकांना दिलासा मिळाला आहे . अखेर शेतकरी कामगार पक्ष छावणी चालकांच्या मदतीला धावून आला असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे चारा छावणी प्रतिनिधी प्रशांत बलेकर यांनी दिली . सांगोला तालुक्यातील एप्रिल २०११ ते ऑगस्ट २०१ ९ अखेर वित्तीय वर्ष २०१ ९ -२० या कालावधीतील चारा छावण्यांचे एकूण अनुदानापैकी ७१ कोटी ८५ लाख अनुदान देण्यात आले असून उर्वरित २२ कोटी ५४ लाख इतकी अनुदानाची रकम शासनास परत पाठवली होती.त्यामुळे चारा छावणी चालविणान्या संस्थांची बरीच मोठी रकम आजतागायत शासनाकडून येणे आहे.
ही अनुदानाची रकम तातडीने सर्व चारा छावण्यांना मिळवून देण्याकरता राज्याचे मदत । पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे डॉ . बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी बारंबार भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा केला होता . या पाठपुराव्यामुळे मंत्री विजय बडेट्टीवार ( आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन ) यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २४ ऑगस्ट , २०२१ आयोजित करण्यात आलेली बैठक काही अपरिहार्य कारणांमुळे होऊ शकली नाही . सदरहू बैठक दिनांक काल बुधवार दि . २५ ऑगस्ट , २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता मा.मंत्री महोदयांचे दालन क्र . ३०१ , तिसरा मजला , मुख्य इमारत ,मंत्रालय , मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.तसेच या बैठकीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी व प्रांत अधिकारी सोलापूर यांच्यासह सांगोला तालुक्यातून शेतकरी कामगार पक्षाचे चारा छावणीचे प्रतिनिधी म्हणून माजी सभापती बाळासाहेब काटकर , प्रशांत बलेकर , अमोल खरात , डॉ . दादासाहेब जगताप उपस्थित होते .
या बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यात ५० टके अनुदान वाटप करण्याच्या सूचना मंत्री विजय बडेडीवार यांनी दिल्या असून उर्वरित ५० टक्के रकम तपासणी बैठकीत दिल्या असल्याची माहिती अमोल खरात यांनी दिली . गेल्या दोन वर्षापासून तालुक्यातील चारा छावण्यांच्या अनुदानाची रकम शासनाकडून बेणे असल्याने त्याच छावणी चालकांना प्रचंड आर्थिक ताण सोसावा लागला आहे ही रकम शासनाकडून मात मिळवण्यासाठी राज्याचे मदार पुनर्वसन मंत्री विजय बडेट्टीवार यांच्याकडे
डॉ.बाबासाहेब देशमुख , डॉ.अनिकेत देशमुख व शेतकरी कामगार पक्षाचे चारा छावणी प्रतिनिधी यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्यामुळे या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळे चारा छावणी चालकांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी कामगार पक्षच छावणी चालकांच्या मदतीला धावून आला असल्याचे महाराष्ट्रातल्या बाराछावणी चालकांना मधून बोलले जात आहे .
0 Comments