google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील ५६ हजार कलाकारांना मिळणार प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत !

Breaking News

राज्यातील ५६ हजार कलाकारांना मिळणार प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत !

 राज्यातील ५६ हजार कलाकारांना मिळणार प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत !


 महाराष्ट्र राज्यातील शेकडो लोककलावंत लोककलाकार लोककला पथकाचे चालक मालक , निर्माते यांना कोरोनाच्या काळात मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले . सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ . राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासमोर कलाकारांनी आपल्या अडचणीं मांडल्या होत्या . नामदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर कलाकारांचा हा प्रश्न मांडला . . . सरकारने कलाकारांसाठी एकरकमी कोव्हिड दिलासा अनुदान देण्यास मान्यता दिली आहे 

यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्यमंत्री मंडळासमोर त्वरीत आणावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे . याबद्दल कलापथक निर्माता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेवून आभार मानले . कोल्हापूर कलापथक निर्माता असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद सुतार , उपाध्यक्ष शारदा हेलगे

 , अमर विधाते रजनी गोरड , श्रीनिवास कुंभार , सेक्रेटरी गुरुप्रसाद कुलकर्णी , बबीता काकडे , गोविंद सुतार यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी सांस्कृतिक कार्य विभागाकडील विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती . गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोव्हिड . संसर्गाशी लढा देत आहे .

 राज्यातील कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमावर निर्बंध असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे कलाकारांची उपासमार होत आहे . यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी कलाकारांनी केली होती . या मागणीबाबत बैठकीत चर्चा झाली . राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे . याप्रश्नी सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ . राजेद्र पाटील यड्रावकर यांनी पाठपुरावा केल्याने कलापथक निर्माता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार यड्रावकर यांचा सत्कार करुन आभार मानले .

Post a Comment

0 Comments