google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या ,पोलिसांपुढे आव्हान ;

Breaking News

मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या ,पोलिसांपुढे आव्हान ;

 मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या ,पोलिसांपुढे आव्हान ;


 दुचाकी चोरीच्या घटनांवर कधी अंकुश लागणार ?सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : सांगोला शहर आणि तालुक्यात मोटरसायकली चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या असून दिवसेंदिवस दुचाकीच्या चोऱ्यांमध्ये वाढ होतांना दिसत आहे . तालुक्यात अशा दुचाकी चोरांची टोळी सक्रीय असल्याचा अंदाज दिसून येत आहे . यामुळे दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट कधी थांबणार ? असा सवाल निर्माण होत आहे 

 दिवसाढवळ्या दुचाकींच्या चोऱ्या होतात व त्यांचा तपास पोलीसांच्या डायरीला नोंद झालेला असतो . अशा या गाड्यांची चोरी कधी थांबणार ? याची तालुक्यात सर्वत्र चर्चा आहे . सांगोला तालुक्यात विविध ठिकाणी गेली अनेक दिवसापासून दुचाकी चोरट्यांचे सत्र सुरूच आहे . रहदारीच्या व वर्दळीच्या ठिकाणी हे चोरट्यांची टोळी आजूबाजूचा अंदाज घेऊन गाड्यांचे लॉक तोडून लोकांच्या दिवसाढवळ्या नवीन गाड्या लंपास केल्या जातात . 

असा हा दुचाकी चोरीचा प्रकार सांगोला तालुक्यात काही नवीन नाही . पण आता दिवसेंदिवस दुचाकी चोरीमध्ये वाढ होत आहे . असा चोरीचा प्रकार थांबायला पाहिजे . वर्षभरात शेकडो मोटारसायलकींची चोरी झाली असून अद्यापही मोटरसायकल चोरट्यांचा बंदोबस्त झाला नाही . चोरीस गेलेल्या मोटरसायकली व शोध लागलेल्या मोटरसायकली यात बरीच तफावत आहे . शहरात अधून - मधून रात्री पहाटेच्या  वेळेस मोटरसायकली चोरीचे सत्र सुरूच आहे . 

मात्र , यावर नियंत्रण मिळवण्यात पोलीस विभागाला यश मिळालेले नाही . त्यामुळे चोरटे पुन्हा मोटरसायकली चोरी करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण करत आहेत . मोटरसायकल चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे . किमान आता तरी पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यांचा बंदोबस्त करून या चोरीच्या घटनांना पूर्णविराम लावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे . मोटरसायकलीची चोरी झाल्यानंतर केवळ पोलीस ठाण्यात दप्तरी नोंद केली जात आहे . मात्र पोलिसांना अद्यापही चोरट्यांचा शोध लागला नाही . सर्वसामान्यांच्या दुचाकी चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांवर कधी अंकुश लागणार ? सक्रीय असलेल्या या टोळीच्या कधी मुसक्या आवळल्या जाणार ?

 तालुक्यात सतत कोठे ना कोठे सुरू असणारा असा मोटरसायकल चोरट्यांचा खेळ कधी थांबणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यामुळे दुचाकी चोऱ्यांवर अंकुश लावण्याचे पोलीसांसमोर आव्हान असून ते कितपत यशस्वी ठरतात ? हे पाहण्याची जनतेला उत्सुकता आहे . दुचाकीधारक बाहेर निघाल्यानंतर हॉटेल , दवाखाने , वर्दळीच्या व रहदारीच्या ठिकाणी आपली गाडी चोरी जाते की काय ? अशी भिती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे .

Post a Comment

0 Comments