google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पडळकरांची बैलगाडा शर्यत झालीच; रात्रीत बदलला ट्रॅक

Breaking News

पडळकरांची बैलगाडा शर्यत झालीच; रात्रीत बदलला ट्रॅक

 पडळकरांची बैलगाडा शर्यत झालीच; रात्रीत बदलला ट्रॅक 


प्रशासनाने शर्यत होऊ न देण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. मात्र काहीही झालं तरी शर्यत पार पडणार असं म्हटलेल्या पडळकरांनी शर्यत अखेर भरवलीच.

सांगली - बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही असं म्हणणाऱ्या प्रशासनाला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुंगारा दिला आहे. सांगलीत पहाटे पाचच्या सुमारास पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं. प्रशासनाने शर्यत होऊ न देण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा  तैनात केला होता. मात्र काहीही झालं तरी शर्यत पार पडणार

 असं म्हटलेल्या पडळकरांनी शर्यत अखेर भरवलीच.सांगलीतील झरे इथं शर्यत होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. बंदी असल्यामुळे शर्यतीच्या आयोजनाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. त्यामुळे शर्यत कशी होणार याकडे लक्ष लागले होते. पण शेवटी पोलिस आणि प्रशासनाला गुंगारा देत पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली.शर्यतीसाठी पडळकरांच्या फार्म हाऊस शेजारी ट्रॅक केला होता. 

पण याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तो ट्रॅक उद्ध्वस्त करण्यात आला होता. त्यानंतर पडळकरांच्या समर्थकांनी तिथून दुसऱ्या ठिकाणी शर्यतीचं आयोजन केलं. त्यासाठी रात्रीत दुसरा ट्रॅक तयार करून पहाटे पाचच्या सुमारास शर्यती घेण्यात आल्या. यामध्ये पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाल्याचं समजते. पडळकर मात्र शर्यतीच्या ठिकाणी नव्हते. पण त्यांच्याच हस्ते बक्षीस वितरण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments