अहो , हे कसलं लॉकडाउन ! कडक निर्बंध असतानाही ग्रामीण भागात नियमांची पायमल्ली
सांगोला : ' आहो , हे कसलं लॉकडाउन ?, शहरातील दुकान बंद केली म्हणजे झालं का लॉकडाउन ? शहरातील एक व्यापारी भावनिक मात्र त्वेषाने बोलत होते . खरोखर सांगोला शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकान बंद असतात . मात्र , ग्रामीण भागामध्ये सर्रास दुकाने , हॉटेल सुरु असतात . नागरिक विनाकारण बाहेर फिरतानाही दिसतात , मात्र कारवाई काहीच होत नसल्याने कोणालाच गांभीर्य नसल्याचे दिसून येते .
ग्रामीण भागातील विविध कार्यक्रमांना होणारी गर्दी बघून कोरोनाचा संसर्ग आता संपलाच काय ? असाच प्रश्न पडतो आहे . जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीमुळे संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे . वाढत्या रुग्णसंख्यामुळे सांगोल्याचा या पाच तालुक्यात समावेश आहे . तालुक्यात सध्या ७८० रणांवर उपचार सुरू असून ११ हजार ८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे . कोरोनामुळे आत्तापर्यंत १४६ जणांचे बळी गेले आहेत .
दिवसेंदिवस तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक जणांना गांभीर्य मात्र दिसत नाही . सध्याच्या लॉकडाउनच्या काळात अनेक निबंध असतानाही शहरापेक्षा ग्रामीण भागांमध्ये हे निबंध पाळले जात नसल्याचे चित्र दिसून येत | आहे . ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेबरोबरच इतर दुकानही खुलेआम उघडली जात आहेत . हॉटेल , गाड्यांवर मोठी गर्दी दिसून येत आहे .
ग्रामीण भागामध्ये विविध कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी बघितली तर कोरोनाचा संसर्ग संपला आहे काय असेच जणू वाटते . शहरात ठराविक ठिकाणी रस्त्यांवर कारवाईचा बडगा होत असला तरी अनेकजण बेफिकीरपणे रस्त्यावरून फिरताना दिसतात .
0 Comments