शेती पंपाचा वीज पुरवठा तात्काळ चालू करा : आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला / प्रतिनिधी : कोरोना महामारी शेतमालाचे गडगडलेले भाव या संकटाचा शेतकरी सामना करीत असताना अचानक पणे कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरण कडून शेतकऱ्याच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन खंडित करण्यात येत आहे यावर्षी पावसाळा चांगला असल्याने शेतकऱ्याच्या शेतातील पिके ही जोमात आहेत बाजरी , मका , उडीद , सूर्यफूल , डाळींब या पिकांना पावसाने ताण दिल्याने
पाण्याची गरज आहे परंतु मात्र अचानक शती पपाच कलेक्शन खंडित केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे . तालुक्यातील शेतकर्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे आपली कैफियत मांडली याची दखल घेत आमदार शहाजीबापू पाटील यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे कनेक्शन तात्काळ चालू करावे अशा सूचना दिल्या उद्याच्या उद्या जर शेतकऱ्यांचा शेती पंपाचा वीजपुरवठा पूर्वरत नाही केल्यास जन आंदोलन करावे लागेल असा इशाराही महावितरणला दिला .
0 Comments