गाडी चालवताना काळजी घ्या ; १० रुपयेच्या पाण्याच्या बिसलरीने घेतला ३ जणांचा जिव तर दोघेजण जखमी
खंडाळा ( घाट ) ता . पुसद जि . यवतमाळ येथे तवेरा गाडीचा अपघात झाला . आणि या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला , तर दोघे जन सिरीयस आहेत . हा अपघात एका पाण्याच्या बिसलेरी मुळे झालेला आहे . तवेरा गाडीच्या कल्ज व ब्रेक पायडलच्या मध्ये , गाडीत असणारी पाण्याची बिसलेरी बाटली अडकल्यामुळे हा मोठा अपघात झालेला आहे . आणि या अपघातामध्ये एकूण तीन लोकांचा जीव गेला असून दोन लोक सिरीयस आहे.
तरी आपण गाडी चालवत असताना किंवा गाडीत प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पाण्याची मोकळी किंवा भरलेली बॉटल काळजी पुर्वक ठेवली पाहिजे . अनेकदा आपण गाणी पिऊन झाल्यावर पाण्याची बॉटल गाडीतच टाकतो मात्र हि १० रुपयाची बॉटल देखील अपघाताला देखील निमंत्रण देवू शकते . हे या अपघातामुळे सिद्ध झाले आहे.त्यामुळे गाडी चालवत असताना किंवा गाडीत प्रवास करत असताना काळजी घ्यावी .
0 Comments