दारुच्या आहारी गेलेल्या पतीने पैशाच्या कारणावरून पत्नीला मारहाण करून केले जखमी ; पती विरूद्ध गुन्हा दाखल !
सांगोला । प्रतिनिधी : मद्यपी पतीने १५०० रुपये घेतल्याच्या कारणावरून पत्नीला शिवीगाळ करीत दोरीने उजव्या हातावर मारले तर वरवंटा तोंडावर मारल्यामुळे तिच्या तोंडातून रक्तस्त्राव होऊन जखमी झाली . ही घटना १८ ऑगस्ट रोजी पहाटे २ च्या सुमारास हटकर मंगेवाडी ता . सांगोला येथे घडली . हटकर मंगेवाडी येथील सुगंधा भुसनर ही विवाहित महिला अंगणवाडी मध्ये मदतनीस म्हणून नोकरी करून कुटुंबाला हातभार लावते तर पतीस दारूचे व्यसन असल्यामुळे तो त्याच्या आहारी गेला आहे
१७ ऑगस्ट रोजी मारुती भुसनर मद्यप्राशन करून घरी आला त्याने जवळचे १५०० रुपये घरात कोठेतरी लपवून ठेवले व दुसऱ्या दिवशी त्याने पत्नीला माझे पैसे घेतले का म्हणून विचारले असता तिने नाही म्हणून सांगितले त्यावेळी त्याने दुपारी १२ च्या सुमारास घरात पैसे शोधत असताना दोरीने पत्नीच्या उजव्या हातावर मारल्यामुळे बांगड्याच्या काचा हातात घुसून जख्म झाली होती . दरम्यान त्याच दिवशी रात्री पुन्हा तो दारू पिऊन घरी आला असता पत्नी सुगंधा हिने त्यास जेवण वाढले सर्वजण जेवण करून घरात झोपले होते . अचानक मध्यरात्री दोनच्या सुमारास त्याने झोपेत असलेल्या पत्नीच्या तोंडावर वरवंटा मारल्यामुळे तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले त्यामुळे तिने आरडाओरड केला असता सुनेच्या आवाजामुळे जागी झालेल्या सासू , दीर , जाऊ यांनी मारुती यास जाब विचारला . त्यावेळेस त्याने तेथून धूम ठोकली . घडला प्रकार सुगंधा भुसनर हिने वडील विष्णू यजगर यांना सांगितला . याबाबत , सुगंधाभुसनर हिने पती मारूती भुसनर यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे .
0 Comments