केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले १८ ऑगस्ट रोजी सांगोल्यात माजी आमदार स्व.गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट
सांगोला / प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री बुधवार दि . १८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सांगोला तालुक्याचे ऋषितुल्य नेतृत्व मा.आ.गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याबद्दल देशमुख कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेणार
असल्याची माहिती आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी दिली . यावेळी त्यांच्या समवेत आरपीआयचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा.ना.राजाभाऊ सरवदे , जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे , युवक जिल्हाध्यक्ष बापूसाहेब बनसोडे , जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे ,
जिल्हा खजीनदार विक्रम शेळके , जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले , जिल्हा संघटन सचिव रवी गायकवाड ,जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर गवळी , अंबर काटे , जिल्हा चिटणीस राजा मागाडे , रवी बनसोडे , मातंग आघाडी तालुकाध्यक्ष विवेकानंद क्षीरसागर , होलार आघाडी तालुकाध्यक्ष धर्मराज भंडगे , युवक आघाडी तालुकाध्यक्ष सुरज होवाळ , शहराध्यक्ष दाऊद काटे , युवक शहराध्यक्ष प्रविण भोरकडे , युवक जिल्हा उपाध्यक्ष नवा सरतापे , तालुका सरचिटणीस संजय गाडे , तालुका उपाध्यक्ष वसंत होवाळ , सदाशिव सावंत , गौतम जगधने , सुरेंद्र ढोबळे , युवक कार्याध्यक्ष सौदागर सावंत , सरचिटणीस विशाल जगधने , ग्रा.पं.सदस्य अर्जुन लांडगे , युवक नेते संजय करडे , अमोल मोरे , दत्ता सावंत , तेजस आढाव , महुद शहराध्यक्ष विशाल सरतापे , आशिष गायकवाड , बजरंग गायकवाड , तुकाराम होवाळ , विकास काटे , शशिकांत साबळे , युवक नेते सखाराम लांडगे , चंदनशिवे , महेश पाटोळे , शंकर फाळके , तानाजी रणदिवे ,
शहाजी माने , आण्णा गस्ते , धनाजी सावंत , महेंद्र सावंत यांच्यासह तालुक्यातील आरपीआयचे प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत . त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे दि . १८ ऑगस्ट २०२१ रोजी पहाटे ५.४५ सिध्देश्वर एक्सप्रेसने कुडूवाडी येथे आगमन , तेथून पंढरपूर विश्रागृह येथे आगमन व राखीव , त्यानंतर सकाळी १०.०० वाजता आरपीआचे पंढरपूर तालुकाध्यक्ष अर्जुन मागाडे यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल कोर्टी , ता.पंढरपूर येथे मागाडे कुटुंबियांची भेट .
तेथून सांगोलाकडे प्रयाण . सकाळी ११.०० वाजता सांगोला येथे देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट . त्यानंतर पंढरपूर येथील गौतम विद्यालयातील कार्यक्रमास उपस्थिती . त्यानंतर दु . १.०० वाजता पंढरपूर विश्रामगृह येथे पत्रकार परिषद व जेवण , त्यानंतर दु . २,०० वाजता मोटारीने मुंबईकडे प्रयाण
0 Comments