.सांगोला तालुक्यातील नागरिकांची योजनेच्या नावाखाली आर्थिक लुट करणा - यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ; जय मल्हार क्रांती संघटना.म.रा .
सांगोला तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणीचे नागरिक तालुक्यातील शेकडो बोगस शेतकरी ( ज्यांच्या नावे जमीन नाही ) यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवून देतो अशी बतावणी करून त्या बोगस शेतक - यांकडून प्रति व्यक्ती १२००,१५००,२००० रुपये घेवून पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवून देत आसल्याचे प्रकार घडत आहेत .
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकरी यांना डावलून बोगस शेतक - यांना लाभ देण्याचा गोरखधंदा तालुक्यात राजरोसपणे सुरु आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील शेतक - यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना हि कल्याणकारी योजना शेतक - यांच्या हिताकरीता राबवली आहे . मात्र सांगोला तालुक्यात या योजनेत मोठा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता आहे . प्रशासनाच्या निष्काळजीपणा मुळे या कल्याणकारी योजनेचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे . सांगोला तालुक्यातील हजारो पात्र शेतकरी या योजने पासून वंचित आहेत.मात्र ज्याचे नावे एक गुंठा ही जमीन नाही असे शेकडो बोगस शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत . तरी सांगोला तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस शेतक - यांचा शोध घेवून
त्या शेतक - यांची ज्या नागरिकाने ऑनलाइन नोंदणी केली आहे . त्यांचेवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश मंडले यांनी दिला आहे .
0 Comments