भीमनगर येथील काँक्रीट रोडच्या कामाचे नगराध्यक्षा यांच्याहस्ते उदघाटन संपन्न
सांगोला/प्रतिनिधी :लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत शहरातील भीमनगर येथील सार्वजनिक शौचालय ते बलवीर बनसोडे घर रस्ता करणे
कामाचे उदघाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई आनंदा माने यांच्याहस्ते करण्यात आले. सदरचे काम 30 लाख 11 हजार 207 रु. किंमतीचे असून आता ते लवकरच पूर्ण होणार आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, बांधकाम सभापती सौ. अप्सराताई ठोकळे, गटनेते/नगरसेवक आनंदा माने, कामगार नेते बापूसाहेब ठोकळे, मा.नगरसेविका विजयाकाकी बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, चंचल बनसोडे, विनोद रणदिवे यांच्यासह तेथील नागरिक उपस्थित होते.
0 Comments