कसरत झाली ; पण नगरपरिषद केली
अकलूज (एम. एम. शेख) -अकलूज व माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत तर नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतराचा अंतिम अध्यादेश राज्याच्या नगरविकास खात्याने दि. 3 ऑगस्ट रोजी जारी केला.महाविकास आघाडी सरकारने कुरघोड्यांचे राजकारण केल्याने अकलूजकरांना सोशल मीडियावर राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त केला. तसेच न्यायालयाने सरकारला अकलूजकरांना न्याय निर्णय देण्यास भाग पाडले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी कसरत झाली पण नगरपरिषद केली, असा सवाल करीत या निर्णयाचे तीनही गावच्या नागरिकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करुन आनंदोत्सव साजरा केला.अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरीषदेत तर नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतरासाठी सन 2018 पासुन प्रक्रिया सुरु झाली होती.2019 मध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम अध्यादेश जारी होण्याची प्रतिक्षा होती. दरम्यान माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. रणजितसिंह मोहिते पाटील, भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील व तत्कालीन सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.मध्येच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. निवडणुका झाल्यानंतर अंतिम अध्यादेश निघणे अपेक्षित होते. पण गेली दिड वर्षापासून अंतिम अध्यादेश निघाला नसल्याने तीनी गावचे पदाधिकारी व नागरीकांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेवून (दि. 22) जूनपासुन उपोषणाला प्रारंभ केला होता. अखेर तीन वर्षांच्या पाठपुराव्याला 43 दिवसांच्या उपोषणाचे बळ मिळाल्याने महाविकास आघाडी सरकारने कुरघोड्यांच्या राजकारणात अडकवलेली अकलूज नगरपरिषदेची फाईल हाती घेऊन अखेर अकलूजकरांना न्याय द्यावा लागला आहे.अकलूज, माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत, तर नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. त्यामुळे विधानपरिषदेसाठी सर्वच पक्षांना माळशिरस तालुक्यातील मतदान महत्त्वाचे ठरणार आहे. माळशिरस तालुक्यात आताजिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या कमी होणार आहे.सध्या तालुक्यात जिल्हा परिषदेचे 11 व पंचायतसमितीचे 22 सदस्य आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी राहिलेल्याजिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची फेररचना होणार आहे. यामुळे या निवडणुकांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.मीच होणार नगरसेवक तालुक्यात माळशिरस नगरपंचायतीचे 17, नातेपुते नगरपंचायतीचे 17, महाळुंगनगरपंचायतीचे 17 व अकलूज नगरपरिषदेचेअंदाजे 21, असे नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे तालुक्यावर प्रत्येक पक्षांचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे अकलूजमधील प्रत्येक प्रभागात मीच होणार नगरसेवक अशा वल्गना करत तरुणाई गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होऊ लागली आहे. तसेच अपक्षांची संख्याही लक्षणीय असणार आहे. आता एक नगरपरिषद व तीन नगरपंचायतींची निवडणूक एकाचवेळी लागण्याची शक्यता आहे. याकडे सध्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.देर है लेकीन अंधेर नही, याचा प्रत्यय सध्या आम्हाला येत आहे. उशिरा का होईना पण तिनही गावच्या नागरीकांना न्याय मिळाला आहे. अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यामुळे माझे जिल्हा परिषदेचे पद जात आहे. तरीही मला नगरपरिषद झाल्याचा खूप आनंद आहे.
- शितलदेवी मोहिते-पाटील, जिल्हा परिषद सदस्या, अकलूज
0 Comments