google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गरीबांना मोफत गॅस कनेक्शन, उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्या उद्घाटन

Breaking News

गरीबांना मोफत गॅस कनेक्शन, उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्या उद्घाटन

 गरीबांना मोफत गॅस कनेक्शन, उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्या उद्घाटन गोरगरीबांसाठी सुरु केलेल्या उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच प्रारंभ होत आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (मंगळवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.  2016 मध्ये सुरु झालेल्या उज्ज्वला गॅस योजनेत दारिदय्ररेषेखालील कुटुंबातील 5 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार होते. नंतर एप्रिल 2018 मध्ये या योजनेचा विस्तार करुन सात श्रेणीतील महिलांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी 8 कोटीपर्यंत निर्धारित लक्ष्य वाढविले होते.असा करा ऑनलाईन अर्ज..अधिकृतवेबसाईट pmujjwalayojana.com वर क्लिक करा. होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर क्लिक करा. तेथे पीएम उज्ज्वला योजनेचा फॉर्म येईल. फॉर्मवर तुमचे नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि कॅप्चा भरा. आता OTP जनरेट करण्यासाठी बटणावर क्लिक करा नंतर फॉर्म डाऊनलोड करुन जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीमध्ये सबमिट करा फाॅर्मसोबत आधारकार्ड, स्थानिक पत्त्याचा पुरावा, बीपीएल रेशन कार्ड आणि फोटो आदी कागदपत्रे द्यावी लागतील. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल.प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 अंतर्गत केवळ एलपीजी कनेक्शनच नव्हे, तर गॅस स्टोव्ह, भरलेले सिलिंडरही मोफत मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments