google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चोर समजून चक्क सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 जणांना गावकऱ्यांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना

Breaking News

चोर समजून चक्क सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 जणांना गावकऱ्यांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना

 चोर समजून पोलीस अधिकाऱ्यासह 4 जणांना मारहाण  गावात अनोळखी गाडी आल्याने गावातील लोकांना त्यांच्या गाडीवर संशय आला .


 चोर समजून चक्क सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 जणांना गावकऱ्यांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना

म्हणून ग्रामस्थांनी आक्रमक पाऊल उचलत सहाय्यक पोलीस निरीक्षक सह चौघांना मारहाण केली .अहमदनगर चोर समजून चक्क सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 जणांना गावकऱ्यांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात घडली आहे . बुलडाणा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे हे आपल्या नातेवाईकांकडे आरणगाव येथे आले होते . दरम्यान किरण कांबळे हे त्यांचे भाऊ विशाल कांबळे , सासरे संजय निकाळजे आणि सुनील निकाळजे यांच्यासोबत गावठी कोंबड्या खरेदी करण्यासाठी गेले . ग्रामस्थांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन न थांबल्याने ' चोर - दरोडेखोर ' समजून स्थानिक दुचाकीस्वारांनी वाहनाला दुचाकी आडवी घालून गाडी थांबवली . त्यांनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षकआणि सोबतच्यांना जमलेल्या 20 ते 25 जणांनी सदर वाहनावर दगड मारून वाहनातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघांना बाहेर काढून लोखंडी रॉड , बांबू , दगड व काठीने मारहाण केली . सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे यांचे भाऊ विशाल भानुदास कांबळे यांचा आष्टी तालुक्यातील पांडेगवहाण येथील वस्तीवर गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे . त्यामुळे ते खेडोपाडी जाऊन कोंबडी खरेदी करत असतात . दरम्यान ते कोंबड्या खरेदी करण्यासाठी खेडोपाडी गेले होते पण कोंबड्या न मिळाल्याने न मिळाल्याने अरणगाव बसस्थानक येथे आले . नुकत्याच काही दिवसांपूर्वीच आरणगाव शेजारीलवंजारवाडी येथे दरोडा पडला होता . त्यातच गावात अनोळखी गाडी आल्याने गावातील लोकांना त्यांच्या गाडीवर संशय आला . म्हणून ग्रामस्थांनी आक्रमक पाऊल उचलत सहाय्यक पोलीस निरीक्षक सह चौघांना मारहाण केली .आरणगाव येथे गदारोळ सुरू असल्याची माहिती समजताच गावचे सरपंच अंकुश शिंदे आणि त्यांचे सहकारी वेळीच तिथे आले आणि त्यांनी मारहाण करणाऱ्या जमावातून पोलीस अधिकाऱ्यांसह चार जणांना सोडवले . त्यामुळे मोठा अनर्थ टळला . या मारहाणीत चौघेही किरकोळ जखमी झाले . या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे यांचे भाऊ विशाल कांबळे यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात 25 जणांविरोधात भादवी कलम 307 , 341 , 329 , 324 , 143 , 147 , 148 , 149 , 500 , 504 , 506 , 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत .

Post a Comment

0 Comments