सांगोला तालुक्यातील 13 ऑगस्ट पासून सुरु होणारे निर्बंध रद्द करावे- रविंद्र कांबळे.
सांगोला( प्रतिनिधी) दोन वर्षापासून महाराष्ट्रासह सांगोला तालुक्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत होती त्याची दखल घेऊन प्रशासनाने लॉक डाऊन जाहीर केले होते या आदेशाचे पालन सांगोला तालुक्यातील सामान्य नागरिकांसह व्यापारी बांधवांनी देखील त्याचे पालन केले होते व प्रशासनास सहकार्य केले होते त्यानंतर शासनाने अनलॉक केल्यानंतर आत्ता कुठे तरी व्यापारी बांधवांची व्यवसायाची सुरुवात झाले होते अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने मुंबई पुणे या ठिकाणी दिलासा देण्यासाठी वेळेची सूट दिली गेल्यामुळे मुंबई-पुण्यातील व्यापारी बांधवांनी प्रशासनाचे आभार मानले परंतु सांगोला तालुक्यांमध्ये येत्या 13 ऑगस्ट पासून नवीन कडक निर्बंध लागू केल्यामुळे सांगोला तालुक्यातील सामान्य नागरिकांसह व्यापारी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण गेले दोन वर्षापासून व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे अशा परिस्थितीमध्ये आत्ता कुठे तरी दुकानदारांना गिराईक सुरू झाले होते अशा परिस्थितीमध्ये लॉक डाऊन झाले तर व्यवसायासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज, नगरपालिकेचे गाळा भाडे ,तसेच खाजगी मालकांचे गाळा भाडे, कामगारांचे पगार, लाईट बिल हे भरण्यासाठी सुद्धा काही व्यापारी लोकाकडे पैसे नाहीत अशा परिस्थितीमध्ये शासनाने आर्थिक मदत दिली पाहिजे होती. व्यापारी वर्गांचे लाईट बिल गाळा भाडे माफ करायला पाहिजे होते परंतु ते न करता 13 तारखेपासून खडक निर्बंध केल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेले खडक निर्बंध मागे घेण्याची विनंती बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी केलेली आहे तरी वरील विनंतीचा मान ठेवून व दखल घेऊन संबंधित प्रशासनाने निर्बंध मागे घेण्याची मागणी सामान्य नागरिकाकडून तसेच व्यापारी वर्गाकडून केली जात आहे .तरी लोक भावनेचा विचार करून कडक निर्बंध मागे घेणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
0 Comments