google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील ३८ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ;

Breaking News

राज्यातील ३८ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ;

 राज्यातील ३८ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; 


सोलापुरात आले नवे पोलीस आयुक्त  गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या , बदल्यांना अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला . ११ अधिकाऱ्यांना पदोन्नतीसह एकूण ३८ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाच्या वतीने रात्री उशिरा जारी करण्यात आले .


५ अधिकाऱ्यांना अप्पर महासंचालकाचे तर प्रत्येकी ३ डीआयजी व विशेष महानिरीक्षक , सह आयुक्त म्हणून बढती देण्यात आली . अप्पर महासंचालक ( आस्थापना ) के . के . सरंगल यांची बदली करण्यात आली असून , त्यांना नंतर पोस्टिंग दिले जाणार आहे . अधीक्षक , उपायुक्त , उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या दोन दिवसांत जारी केल्या जाणार आहेत . 


बढती , बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अशी ( कंसात कोठून - कोठे ) अप्पर महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी ( सीआयडी - सुधारसेवा पुणे ) , संजय वर्मा ( मुख्य , दक्षता अधिकारी , म्हाडा - अपर महासंचालक नियोजन व समन्वय , मुंबई ) , एस . जगन्नाथन ( नियोजन व समन्वय ते महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सूत्रधारी कंपनी , मुंबई ) , रितेशकुमार ( वायरलेस पुणे - सीआयडी ) , संजीव सिंघल ( प्रशासन - आस्थापना ) ,अर्चना त्यागी ( राज्य राखीव पोलीस दल - सह व्यवस्थापकीय संचालक , पोलीस गृहनिर्माण विभाग ) 


 प्रशांत बुरडे ( उपमहासमादेशक , होमगार्ड - मुख्य दक्षता अधिकारी , म्हाडा ) , अनुपकुमार बलबिरसिंह ( राज्य विद्युत महामंडळ प्रशासन , मुंबई ) , - सुनील रामानंद ( सुधारसेवा पुणे - वायरलेस पुणे ) , प्रवीण सांळुके ( सीआयडी - पदोन्नतीने अपर महासंचालक विशेष अभियान मुंबई ) , मधुकर पांडे ( सागरी सुरक्षा - पदोन्नतीने अप्पर महासंचालक , आर्थिक गुन्हे शाखा ) , ब्रिजेश सिंह ( प्रशासन - पदोन्नतीने उपमहासमादेशक , होमगार्ड ) , चिरंजीव प्रसाद ( आयजी , नागपूर परिक्षेत्र - पदोन्नतीने राज्य राखीव पोलीस दल ) , 


डॉ . रवींद्र सिंघल ( नियंत्रक , वैधमापन शास्त्र - त्याच ठिकाणी पदोन्नती ) . विशेष महानिरीक्षक / सह आयुक्त राजेश प्रधान ( आस्थापना , पोलीस मुख्यालय - सागरी सुरक्षा , राज्य गुप्त वार्ता विभाग ) , अश्वतीराजेश प्रधान ( आस्थापना , पोलीस मुख्यालय - सागरी सुरक्षा , राज्य गुप्त वार्ता विभाग ) , अश्वती दोरजे ( संचालक , पोलीस अकादमी - सह आयुक्त , नागपूर शहर ) , छेरीग दोरजे

 ( विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा , मुंबई - विशेष महानिरीक्षक , नागपूर परिक्षेत्र ) , यशस्वी यादव ( सह आयुक्त , वाहतूक शहर - विशेष महानिरीक्षक , सायबर विभाग , मुंबई ) , राजवर्धन ( महिला अत्याचार प्रतिबंधक - सह पोलीस आयुक्त , वाहतूक मुंबई शहर ) , अंकुश शिंदे ( पोलीस आयुक्त सोलापूर - पदोन्नतीने विशेष महानिरीक्षक , सुधार सेवा मुंबई ) , राजेश कुमार मोर ( केंद्रीय प्रतिनियुक्तीने प्रतीक्षेत संचालक , पोलीस अकादमी ) . अप्पर आयुक्त / उपमहानिरीक्षक डी.आर. कराळे ( अपर आयुक्त , पूर्व विभाग , ठाणे शहर - आयुक्त , सोलापूर शहर ) , प्रवीण पडवळ ( अप्पर आयुक्त , वाहतूक , मुंबई शहर - अप्पर आयुक्त उत्तर विभाग , मुंबई शहर ) , सुनील कोल्हे ( अप्पर आयुक्त विशेष शाखा , मुंबई शहर -सहआयुक्त , 


गुप्त वार्ता विभाग , सध्याचे पद पदावनत करून ) , बी.जे. शेखर ( अप्पर आयुक्त , गुन्हे , नवी मुंबई - उपमहानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , सध्याचे पद पदावनत करून ) , एम.आर. घुर्ये ( उपमहानिरीक्षक , राज्य राखीव दल नागपूर - अप्पर पोलीस आयुक्त , गुन्हे , नवी मुंबई ) , आर.बी. डहाळे ( वायरलेस पुणे - अप्पर आयुक्त , दक्षिण विभाग पुणे शहर ) , अशोक मोराळे ( अप्पर आयुक्त , गुन्हे , पुणे शहर - अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे , ठाणे शहर ) , अशोक कुंभारे ( अप्पर आयुक्त , पश्चिम विभाग ठाणे - उपमहानिरीक्षक , राज्य राखीव दल , नागपूर ) , दिलीप सावंत ( अप्पर पोलीस आयुक्त , उत्तर विभाग - अप्पर आयुक्त , दक्षिण विभाग , मुंबई शहर ) , आर.एन. पोकळे ( अप्पर आयुक्त पिंपरी चिचवड - अप्पर आयुक्त - पश्चिम विभाग , ठाणे शहर ) , संजय शिंदे ( अप्पर आयुक्त पुणे - अप्पर आयुक्त , पिंपरी चिंचवड ) . संजय ऐनपरे 


( अप्पर आयक्त .गुन्हे , ठाणे शहर - उपमहानिरीक्षक , वायरलेस , पुणे ) , सत्यनारायण ( अप्पर आयुक्त , दक्षिण विभाग - अप्पर आयुक्त , वाहतूक मुंबई शहर ) , राजीव जैन ( उपायुक्त परिमंडल २ - पदोन्नतीने अप्पर आयुक्त विशेष शाखा , मुंबई शहर ) , अभिषेक त्रिमुखे ( उपायुक्त परिमंडल ९ - पदोन्नतीने उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस दल ) , सुधीर हिरेमठ ( उपायुक्त , पिंपरी चिंचवड - पदोन्नतीने उपमहानिरीक्षक सीआयडी )

Post a Comment

0 Comments